खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने लांढर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व छत्री वाटप

रोहा-प्रतिनिधी

 रायगडचे लोकप्रिय खासदार सुनिलजी तटकरे साहेबांचा वाढदिवस म्हणजे रोहे तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी पर्वणी असते.आपल्या लाडक्या साहेबांच्या वाढदिवसा निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांढर येथे श्री.अनिल भगत , श्री. जगदिश भगत, श्री.सतिश भगत यांच्यावतीने विद्यार्थ्यांना पिटि किट ड्रेस चे वाटप करण्यात आले . 

दसबा फाऊंडेशन किल्ला यांच्यावतीने विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले.


           👆व्हिडिओ पहा

      सदर कार्यक्रमास श्री.मधुकर पाटील,राष्ट्रवादी जिल्हा  कार्याध्यक्ष,शंकरराव भगत- जिल्हा उपाध्यक्ष, सुरेश मगर -जिल्हा सरचिटणीस , अनिल भगत -तालुका उपाध्यक्ष, जयवंत दादा मुंढे-रोहा तालुका युवक अध्यक्ष, महेश बामुगडे, अरविंद मगर,सतिश भगत,मुकेश भोकटे, शिक्षक वर्ग , विद्यार्थी, युवक मंडळ व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. 

 यावेळी उपस्थितांनी खासदार तटकरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व उदंड आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

Comments

Popular posts from this blog