लायन्स क्लब रोहा च्या अध्यक्षपदी अब्बास रोहावाला यांची निवड

रोहा-प्रतिनिधी

सुमारे ४८ वर्षांची परंपरा असलेल्या लायन्स क्लब रोहा च्या अध्यक्षपदी अब्बास रोहावाला यांची निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष नुरूद्दीन रोहावाला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अब्बास रोहावाला व त्यांच्या कार्यकारणी तील सहका-यांना मंथन मेहता यांनी शपथ दिली. यावेळी लायन्स च्या डिस्ट्रीक्ट चे प्रदीप सिनकर यांनी लायन्स क्लब रोहा चे सभासदत्व घेतलेल्या डाॅ अपूर्व भट, डाॅ तुषार राजपूत व लियाकत हाफिज यांना सभासदत्व दिले.

नवनिर्वाचित अध्यक्ष अब्बास रोहावाला यांनी आगामी काळात रोह्यात डाॅ. भट क्लिनिक यांच्या सहकार्याने सुसज्ज डायलिसिस सेंटर लायन्स क्लब रोहा च्या वतीने उभे करण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच मोतीबिंदू मुक्त रोहा करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले.

यावेळी नियुक्त करण्यात आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे- झोन चेअरपर्सन- नुरूद्दीन रोहावाला,उपाध्यक्ष- सौ. सुश्मिता शिट्याळकर, भाऊसाहेब माने, सेक्रेटरी डाॅ.कृष्णा जरग, सहसेक्रेटरी-सौ.अर्चना कटिरा, खजिनदार- पराग फुकणे, सहखजिनदार- सौ.वर्षा सातपुते, संचालक - प्रदीप दामाणी, रविंद्र घरत, शिरिष सातपुते, प्रमोद जैन, मीलन शहा, क्लब प्रशासक- प्रद्युत कुळकर्णी, सभासद समिती- लक्ष्मण शिट्याळकर, मधुमेह समिती- डाॅ. रूपेश होडबे, कर्करोग समिती- डाॅ. रोहित क्षीरसागर, पर्यावरण- अॕड. हेमंत गांगल, निधी समिती- प्रभातसिंह गिरासे, मार्केटिंग समिती- मितेष कटिरा, जनसंपर्क - सौ.समृद्धी राणे, व्हिजन सेंटर- इल्याझ डबीर, तौसिफ येरूणकर, बुलेटीन संपादक- सैफी रोहावाला, सेवा समिती- जयदेव पवार, टेमर -भावेश दामाणी, टेल ट्विस्टर- रशिदा रोहावाला. 

मावळते अध्यक्ष नुरूद्दीन रोहावाला यांनी प्रास्ताविक करताना मागील वर्षातील कामाचा आढावा घेतला. अलेफिया रोहावाला व जुमाना रोहावाला यांनी सुंदर सूत्रसंचालन केले तर डाॅ कृष्णा जरग यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog