रोह्याला रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्यात,तिकिट वाढ कमी व्हावी यासह अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ रोहा यांनी घेतली रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबई येथे भेट
वरिष्ठ डी.आर. एम. अधिकारी मध्य रेल्वे यांनी मागण्या पुर्ण करण्याचे दिले आश्वासन
मुंबई -प्रतिनिधी
श्री.अभिजित धुरतसाहेब,अध्यक्ष महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ यांच्या प्रेरणेने, गुरुवार दिनांक २८/०७/२०२२ ला महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ पूर्वीची रेल्वे प्रवासी संघर्ष समिती रोहा,यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाऊन घेतली वरिष्ठ डी. आर. एम.अधिकारी यांच्या सोबत भेट घेतली.या भेटीत महासंघाने मागण्यांचे निवेदन सादर केले.ते पुढील प्रमाणे-
१) सेंट्रल रेल्वे चे अंतिम स्टेशन रोहावरून सकाळी ६:३० ते ७:०० दरम्यान रोहा - दिवा अथवा पनवेल मेमु ट्रेन सेवा सुरू करा.
२) पूर्वी थांबत असलेले मेल एक्सप्रेस थांबे रद्द केले ते पुन्हा मिळावे. उदा.दिवा - सावंतवाडी एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस,तुतारी एक्सप्रेस जे मेल ,एक्सप्रेस ट्रेन रोहा मध्ये तांत्रिक थांबे घेत अशा ट्रेन ना कायम स्वरुपी थांबे व तिकीट मिळावे.
३) रोहा - दिवा मेमु ट्रेन तिकीट ५० रुपये वरून २५/- रूपये करावे.
४) रोहा - दिवा - रोहा मेमु ट्रेन चे फेरीत वाढ करा..
५) रोहा रेल्वे स्टेशन वर तिकीट खिडकी वाढवणे.
अशा मागण्या व इतर मागण्या महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ पूर्वीची रेल्वे प्रवासी संघर्ष समिती रोहा यांनी वरिष्ठ डी.आर. एम .अधिकारी यांच्या समोर केल्या.
या मागणीला मध्य रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी ए. डी. आर. एम.अशलकी अहमद, वरिष्ठ डी आर एम. (कोचिंग). रामचंद्र साहेब. डी. सी. एम. दीरेंद्र सिंह , वरिष्ठ डी. एस.सी.जितेंद्र श्रीवास्तव. यांनी सकारात्मक प्रतिसाद देत. रेल्वे महासंघा ला आश्वासन दिले की आम्ही सकाळची ६:३० ते ७:०० रोहावरून पनवेल अथवा दिवा मेमु ट्रेन सुरू करण्यात येईन असे ठोस आश्वासन या वेळी रेल्वे प्रशासन अधिकारी डी. आर. एम. यांनी महासंघा ला दिले त्याच बरोबर.. रोहा रेल्वे स्टेशन वर पूर्वी थांबत असलेले मेल एक्सप्रेस पुन्हा थांबे देण्यात येतील असेही अधिकारी यांनी शब्द दिले आणि जे मेल एक्सप्रेस रोहा मध्ये तांत्रिक थांबा घेतात अशा ट्रेन ही रोहातील रेल्वे प्रवाशी यांच्या साठी तिकीट आणि थांबे देण्यासाठी डी आर एम अधिकारी सकारात्मक आहेत. तसेच सेंट्रल रेल्वे चे अंतिम स्टेशन रोहा वरून मेमु लोकल सेवा रोहा - दिवा रोहा मेमु ट्रेन या मध्ये वाढ करू असेही यावेळी सांगण्यात आले. रोहा रेल्वे स्टेशन गेले अनेक वर्ष प्रलंबित रोहातील प्रवाशाच्या समस्या नक्कीच सोडवण्यात येईन असे ए. डी.आर. एम. अशलकी अहमद साहेब यांनी सांगितले..तसेच तिकीट अधिकारी यांनी आव्हान केले की रोहा वरून डेली अप डाऊन करणारे प्रवाशी व रोहातील प्रवाशी यांनी पास आणि तिकीट हे रोहा वरून काढा. जेणेकरून आम्हीं सेंट्रल रेल्वेचे अधिकारी जास्तीत जास्त अंतिम स्टेशन रोहा वरून - पनवेल, दिवा साठी ट्रेन उपलब्ध करून देऊ शकतो असे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच या वेळी दिवा - रोहा मेमु लोकल पॅसेंजर ट्रेन चे गणपती उत्सवात चिपळूण पर्यन्त पुढे विस्तार करू नये तर रोहा ते चिपळूण नवीन रेक चालवावा असे आवाहन महासंघाचे पदाधिकारी यांनी डी. आर. एम. यांना सूचना दिली या हरकतींवर आम्हीं विचार करू या साठी वेळ लागेल नंतर निर्णय घेऊ असे रेल्वे अधिकारी यांनी सांगितले.
या वेळी या रेल्वे अधिकारी यांच्या भेटी साठी रायगड जिल्हाअध्यक्ष:- श्री. सूर्यकांतजी वाघमारे साहेब, उपाध्यक्ष :- पी. ए.देशमुख सर. रोहा तालुका अध्यक्ष:-फैसलजी अधिकारी सर, उपाध्यक्ष :- विश्वनाथजी जाधव सर, सचिव :- संकेत घोसाळकर, पत्रकार :- रविना मालुसरे - भोसले मॅडम या सर्वांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाऊन वरिष्ठ डी.आर् .एम. व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते . गेले अनेक वर्षा पासून चे सेंट्रल रेल्वेचे दुर्लक्षित अंतिम रोहा रेल्वे स्टेशन मागण्या आणि समस्या या कडे महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ पूर्वीची रेल्वे प्रवासी संघर्ष समिती रोहा यांनी या रोहा रेल्वे स्टेशन वर सेंट्रल रेल्वे चे लक्ष वेधून घेतले हे यश त्यांना या भेट देऊन साध्य केले आहे . तसेच महासंघ जोवर हे सर्व मागण्या आणि समस्या प्रश्न मार्गी लागत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही..प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा जोरदार तयारी निशी प्रयत्न यावेळी केला आहे.. महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ पूर्वीची रेल्वे प्रवासी संघर्ष समिती रोहा याची मध्य रेल्वे च्या रेल्वे अधिकारी यांना आग्रहाची कळकळीची विनंती करण्यात आली की गणपती उत्सवाच्या आधी सकाळी ६:३० ते ७:०० दरम्यान नवीन मेमु लोकल ट्रेन मध्य रेल्वे चे अंतिम रेल्वे स्टेशन रोहा वरून सुरू करावी. जेणे करून या गणपती उत्सवात प्रवाशी या ट्रेन ने प्रवास करू शकतात. या ट्रेनचा श्री गणेशा या गणपती उत्सवात होईन.
पब्लिक रिलेशन P.R.O.चे श्री.प्रविण दत्तात्रय पाटील साहेब यांना हि निवेदन देण्यात आले आहेमध्ये रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी डि.आर.एम.साहेब.श्री.एम अशलकी अहमद. वरिष्ठ डि.सी.एम.(कोचिंग) रामचंद्र साहेब,डि.सी.एम.धिरेंद्र सिंह,वरिष्ठ डि.एस.सी.जितेंद्र श्रीवास्तव साहेब,श्री.अजितसर मासलकर साहेब प्रोटल इन्स्पेक्टर डि.आर.एम.कार्यालययासर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रोहेकरांच्या रेल्वेबाबतच्या समस्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.आता प्रतिक्षा आहे अंमलबजावणीची.
रेल्वे प्रवासी महासंघ करीत असलेल्या प्रयत्नांबाबत रेल्वे प्रवासी व रोहेकर नागरिकांनी धन्यवाद व्यक्त केले आहेत.
Comments
Post a Comment