'रोटरी क्लब ऑफ रोहा' कडुन भातलावणी कार्यक्रम संपन्न

प्रत्यक्ष शेतात जाऊन केली भातलावणी

रोहा-प्रतिनिधी

पावसाळा सुरू झाला की रेनकोट, छत्री, पावसाळी चपला.. अशी जय्यत तयारी करून आपण स्वतःची काळजी घेतच असतो. पण शेतकरी शेतात जाऊन पावसाची तमा न बाळगता शेतात काम करीत असतो.

पहिल्या पावसात भाताची रोपे करायची आणि पावसाने वेग धरला, की एका दमात कुटुंबाने भातलावणी करायची, अशी परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे.

परंतु प्रत्यक्ष शेतात काम करून एक दिवस तरी भातलावणी करावी, या भावनेतून रोटरी क्लब ऑफ रोहा च्या सदस्यांनी क्लब डायरेक्टर रो.हेमंत ठाकूर यांच्या विषेश सहकार्याने आणि अध्यक्ष रो.सुरेंद्र निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली दि. २२ जुलै २०२२ रोजी हिरवाईने नटलेल्या डोंगरदऱ्यांच्या कुशीत असलेल्या यशवंतरखार येथे भातलावणी चा नेत्रसुखद सोहळा संपन्न झाला.

यावेळी क्लबचे अध्यक्ष रो. सुरेंद्र निंबाळकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. एक दिवस तरी जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांसाठी असावा यासाठी  भातलावणी  कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. भविष्यातही "रोटरी क्लब ऑफ रोहा " कडुन असे उपक्रम चालूच राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

या उपक्रमासाठी क्लब चे सदस्य कुटुंबीयांसह उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog