हनुमान नगर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , व शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप

गितराज म्हस्के यांचा स्तुत्य उपक्रम

रोहा-प्रतिनिधी

 रोहे शहरातील हनुमान नगर येथील सन -२०२२ या शैक्षणिक वर्षामध्ये उत्तमप्रकारे गुण संपादित करून उत्तीर्ण झालेल्या  १०वी,१२वी व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आणि शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करून गितराज म्हस्के हे सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबवित असतात.. 

       सालाबादप्रमाणे यावर्षी देखील गितराज म्हस्के यांच्या माध्यमातून सन -२०२१ / २२ या शैक्षणिक वर्षामध्ये उत्तमप्रकारे गुण संपादित करून उत्तीर्ण झालेल्या १०वी,१२वी व पदवीधर गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले तर शालेय विद्यार्थांना वह्या,रजिस्टर,पेन, पेन्सिल,कम्पोस बॉक्स शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. 

 सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने दरवर्षी महत्त्वपूर्ण उपक्रम ते राबवित असतात. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी उपक्रमशिल शिक्षक नंदकुमार मरवडे सर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थांनी शालेय जीवनामध्ये अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता मोठ्या चिकाटीने,जिद्दीने व सातत्यपूर्ण प्रयत्न करत  अभ्यासाकडे लक्ष वेधून उच्चतम ध्येय डोळ्यासमोर ठेऊन आपली शैक्षणिक प्रगती साधावी.

  याप्रसंगी हनुमान नगर येथील जेष्ठ नागरिक कृष्णा म्हस्के, नरे बाबा,प्रमोद मयेकर,परशुराम शिर्के, कृष्णा शिंदे,रमेश थळे,गोटिराम मालुसरे, नंदू वागळे, योगिराज म्हस्के, अमित कासट,विष्णू नरे,निखिल शिर्के, जनार्दन ठाकूर,मयूर मालुसरे,आकाश उमटराकर,राजेंद्र गावडे,राजू जाधव,कला पवार, प्रज्योती मयेकर,महिला संरक्षण संघटनेच्या रोहा शहराध्यक्षा निविता जंगम,आदी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर  मंडळी व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विद्यार्थी मित्र..

Comments

Popular posts from this blog