खासदार सुनिलजी तटकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने स्तुत्य उपक्रम 

मंगळवार दिनांक १२ जुलै २०२२ रोजी किल्ला येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

रोहा-प्रतिनिधी

            खासदार सुनिलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी,मोफत आणि अल्प दरात चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

               मुंबई मधील सुप्रसिद्ध तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळ यांच्या सहकार्याने हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच नेत्र तपासणी मोफत आणि अल्प दरात चष्म्याचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 12 जुलै 2022 रोजी सकाळी ठिक दहा वाजता हा कार्यक्रम ओम नमः शिवाय मंगल कार्यालय कालिदास हॉल किल्ला येथे संपन्न होणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक महेश बामुगडे,दिपक जमदाडे, रोहित माळी! नरेश बामगडे, दिनेश शिंदे, त्याचप्रमाणे विशेष सहकार्य श्री.रुपेश बामगुडे जनार्दन बामुगडे,प्रमोद दिघे यांनी केले आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -किल्ला, अशोक नगर, महाबळे चाळ, आदिवासीवाडी व ग्रामस्थ मंडळ किल्ला अथक परिश्रम घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog