सुंदरराव मोरे महाविद्यालयात आनंदवारी भक्ती गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

    पोलादपूर- ऋषाली राजू पवार 

            पोलादपुर तालुक्याला फार मोठी परंपरा लाभली असून तालुक्यातील युवा पिढीने वारकरी संप्रदायाचा हा सांस्कृतिक वारसा पुढे न्यावा असे आवाहन ह. भ. प. गुरुवर्य रायगड भूषण श्री. विठ्ठल आण्णा घाडगे यांनी केले आहे.

          शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ महाड संचलित सुंदरराव मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील वाड:मय मंडळाच्या शैक्षणिक वर्ष २०२२- २३ मधील उपक्रमांच्या उद्धघाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आनंदवारी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे उद्धघाटन प्रमुख अतिथी श्री. विठ्ठल आण्णा घाडगे प्राचार्य डॉक्टर दिपक रावेरकर, उपप्राचार्य सुनील बळखंडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि विठ्ठलाची आरती करून करण्यात आले. यावेळी आपल्या प्रास्ताविकामध्ये मराठी विभाग प्रमुख व संत साहित्याच्या अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर रविंद्र सोमवंशी यांनी आरती, श्लोक ,स्तोत्र ,भजन इत्यादी विविध साहित्यांच्या प्रकारांचे उल्लेख करून तरुण पिढीने या साहित्य प्रकाराची आणि त्यातून व्यक्त होणारी मानवी जीवनाच्या आशियाची ओळख करून घ्यावी असे मत आपल्या प्रास्ताविकामध्ये व्यक्त केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी वर्ग आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog