राकेश कागडा यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर पदी निवड
रोहा-प्रतिनिधी
रोहे शहर व परिसरात रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्री .राकेश कागडा यांची सन 2022-2023 या रोटरी वर्षाकरिता असिस्टंट गव्हर्नर पदी निवड करण्यात आली.
श्री .राकेश कागडा यांनी या आधीही रोटरी मध्ये विविध पदे भूषवली असून ,रोटरीचे काम रोह्यात सुरू करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहॆ.
रोटरी क्लब रोहाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अत्यंत उत्तम काम केलेले आहॆ.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग ,पेण ,गोरेगाव येथील क्लबचे ए .जी .पद राकेश कागडा यांच्याकडे देण्यात आले असून त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकक्षा रुंदावणार आहेत.
श्री .राकेश यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहॆ.
Comments
Post a Comment