अदिती तटकरे यांचा मास्टर स्ट्रोक
यशवंतखार विभागातील पाणी प्रश्न लागणार मार्गी
यशवंतखार नळ पाणीपुरवठा योजनेसाठी रुपये 93 लाख 74 हजार निधी मंजूर
करंजवीरा नळ पाणीपुरवठा योजनेसाठी रुपये 39 लाखांची मंजुरी
तर धोंडखार तर्फे उमटे नळ पाणीपुरवठा योजनेसाठी रुपये 47 लाख 61 हजार निधीला मंजूरी
रोहा-प्रतिनिधी
यशवंतखार विभागातील पाणी प्रश्नावर गेले अनेक वर्ष राजकारण होत होते.खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार अनिकेत भाई तटकरे व तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी या विभागातील पाणी प्रश्न समजून घेऊन तो विक्रमी वेळात सोडविण्याचा चंग बांधला. त्याचीच पूर्तता म्हणून दिनांक 6 जुलै 2022 रोजी सुतारवाडी येथे विभागातील कार्यकर्त्यांकडे आमदार अदिती तटकरे व आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या शुभहस्ते नळ पाणीपुरवठा योजना निधी मंजुरीचे पत्र सुपूर्द करण्यात आले.
नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक कशी करावी? याचा मूर्तीमंत आदर्श तटकरे कुटुंबीयांनी दाखवून दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे यशवंतखार विभागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून विभागातील ग्रामस्थ व विशेषतः महिलावर्ग त्यांना धन्यवाद देत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मार्च 2022 मध्ये यशवंतखार विभागातील युवा नेतृत्व श्री. संतोष नथराम भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशवंतखार विभागातील पाणी प्रश्नी सुतारवाडीला पालकमंत्री अदिती तटकरे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.तात्कालिन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या विषयाची गंभीर दखल घेऊन दिनांक 8 एप्रिल 2022 रोजी मंत्रालयातील आपल्या दालनात विभागातील कार्यकर्त्यांसह संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली. याच बैठकीत तीनही गावांच्या योजनांचा आराखडा सादर करण्यात आला.त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. एवढे करून पालकमंत्री थांबल्या नाहीत, तर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी या योजनांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला.
एकाच वेळी या तिन्ही गावच्या पाणी योजना निधी मंजुरीचे आदेश आल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
खासदार सुनील तटकरे ,अदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांच्यामार्फत पाणीपुरवठा योजनांच्या पूर्ततेसाठी यशवंतखार विभागातील युवा नेतृत्व संतोष नथुराम भोईर, सरपंच स्वप्नाली संतोष भोईर, उपसरपंच अपर्णा शामित दिवकर, ग्रामपंचायत सदस्य तुषार ठाकूर, रविंद्र ठाकूर,गुलाब वाघमारे, योगेश वाघमारे, संजय राणे, ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग भोईर,नथुराम ठाकूर, विठोबा गुंड, नामदेव मढवी, दिपक दिवकर,धर्मा जानू ठाकुर, तंटामुक्त अध्यक्ष हरिभाऊ दिवकर, विलास दिवकर,अश्विन भोपी ,काशिनाथ धुमाळ, योगेश ठाकूर ,मोहन म्हात्रे ,प्रकाश दिवकर ,मधुकर तांबडे,मंगेश सुरणकर ,निलेश सुरणकर,शामित दिवकर, हरिश्चंद्र जवरत, आबा जंगम, सुभाष पाटील, संताजी ठाकूर तसेच करंजवीरा-दापोली-धोंडखार येथील गणेश निकम,रामचंद्र मोरे, बाळाराम मोरे, लक्षण मोरे, शाम ठाकूर, प्रवीण घरत, संतोष मढवी, प्रशांत घरत,बाळकृष्ण पाटील,अमोल पाटील, मारुती पाटील, यशवंत म्हात्रे, अंनत सरणेकर मंगेश ठाकूर इत्यादी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment