खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवक अध्यक्ष जयवंतदादा मुंढे यांचा स्तुत्य उपक्रम

आदिवासी बांधवांना छत्र्या तर

 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

रोहा-प्रतिनिधी

        बुधवार दिनांक 13 जुलै 2022 रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून राष्ट्रवादी रोहा तालुका युवक अध्यक्ष जयवंत दादा मुंढे यांनी खासदार सुनिल तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी आदिवासी बांधवांसाठी छत्र्या व शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संभे आदिवासी वाडी, बारसोली आदिवासीवाडी, लांढर आदिवासी वाडी, किल्ला आदिवासी वाडी, बाकडे पाले आदिवासी वाडी, धाटाव आदिवासी वाडी येथील  सर्व कुटुंबांना छत्री  वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणारे जयवंत दादा आदिवासी बांधवांसाठी गरजेला उपयोगी पडणाऱ्या वस्तू नेहमीच देत असतात.सध्या पावसाळा सुरू आहे,यावेळी आदिवासी बांधवांची गरज लक्षात घेऊन साहेबांच्या वाढदिवसानिमित्त  छत्र्यांचे वाटप करण्यात आले. माजी पालकमंत्री तथा आमदार आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते छत्री व शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी माजी पालकमंत्री तथा आमदार अदितीताई तटकरे यांच्यासह रोहा तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर, विजयराव मोरे, सुरेश मगर, अनिल भगत, शंकरराव भगत, ज्ञानेश्वर साळुंखे, मयूर खैरे, तानाजी देशमुख, घनश्याम कराळे, स्वप्नील शिंदे, गुणाजी पोटफोडे,सतिश भगत, मंगेश देवकर, गौरव सुर्वे, अक्षय देशमुख, विजय दळवी, केशव भोकटे, शैलेश मोरे,राहुल शिंदे, सूर्यकांत मोरे, प्रशांत बर्डे,अमोल टेमकर, जितू साळुंखे, योगेश लहाने, वामन पवार,अभिजीत पोकळे,दिलीप पाब्रेकर व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयवंतदादा मुंढे यांच्या ह्या अभिनव उपक्रमाबद्दल आमदार अदिती तटकरेंसह सर्वच मान्यवरांनी जयवंतदादांचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog