"मी जो घडलो,तो कै.अशोकशेठ लोखंडे यांच्यामुळेच"- खासदार सुनिल तटकरे 
तळा-किशोर पितळे
"मी जो घडलो, तो कै.अशोकशेठ लोखंडे यांच्यामुळे" असे सांगत खासदार सुनिल तटकरे यांनी कै.अशोकशेठ लोखंडे यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. कै.अशोकशेठ लोखंडे यांचा चौतिसावा स्मृतिदिन समारंभ रविवार दिनांक ८ मे २०२२ रोजी अशोक ल.लोखंडे विद्यामंदिर पिटसई येथे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे रायगड रत्नागिरीचे खासदार सुनिल तटकरे यांनी कै.अशोकशेठ लोखंडे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.                       या स्मृतिदिन समारंभात तटकरे म्हणाले की, कै.अशोकशेठ लोखंडे यांचे योगदान माझ्या आयुष्यात खूप मोठे आहे.त्यांच्या विषयी भावना शब्दात व्यक्त करता येणार नाही.आज मी जो उभा आहे तो अशोकशेठ लोखंडे यांच्यामुळेच.अशोक ल. लोखंडे विद्यामंदिर या शाळेने कुठलीही अपेक्षा न करता केवळ विद्यार्थी घडवण्याचे काम केले विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक उपजत असलेले गुण याच्यामध्ये बदल न करता त्या विकसित करून विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचे काम ही शाळा करत आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण देशात तळा तालुक्याचे नाव लौकीक करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.मी एक ठराविक रक्कम या शाळेला देणार आहे.या रक्कमेच्या येणाऱ्या व्याजाने शिक्षकांनी परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.त्याचप्रमाणे मालूक-पिटसईकोंड आणि रहाटाडवाडी ते रहाटाड रस्ता येत्या कालावधीत जिल्हा नियोजन मधून पूर्ण करून घेऊ जेणे करून विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास सुलभ होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.                                           या समारंभास अशोक ल.लोखंडे विद्यामंदिर विश्वस्त वसंतशेठ लोखंडे, विश्वस्त महादेव गोळे,श्रीमतीअलका अशोक लोखंडे,निखिल लोखंडे,नाना भौड,मारुती शिर्के,संस्था अध्यक्ष कृष्णा पंदेरे,सदस्य खेळू वाजे, गणपत जगताप, ठाकर गुरुजी,रमेश पिंपळे,ह्दय रेडिज,लक्ष्मण जाधव पिटसई विभाग ज्ञान प्रसारक मंडळ कार्यकारणी सदस्य व सर्व सभासद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog