तळा नगरपंचायतीला निधी कमी पडू देणार नाही- खासदार सुनिल तटकरे

पाणी योजना,नाट्यगृह, एसटी स्टँड, नगरपंचायत इमारत उभारणार असल्याची खासदारांची ग्वाही

तळा- संजय रिकामे

तळा नगरपंचायत हद्दीतील तब्बल तीन कोटी रुपयांचे २१ विकासकामांचे भूमिपूजन रायगडचे लोकप्रिय खा.सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते तळा शहरात पार पडले या भूमिपूजन कार्यक्रमा नंतर पार पडलेल्या जाहीर सभेत खा.सुनील तटकरे यांनी तळा शहरासाठी पाणी योजना, नाट्यगृह, एसटी स्टँड आणि सुसज्ज तळा नगरपंचायत उभारणार असल्याची ग्वाही तळे वासियांना दिली या जाहीर सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तळा तालुका अध्यक्ष नाना भौड, शहर अध्यक्ष महेंद्र कजबजे,महिला अध्यक्षा जानव्ही शिंदे, नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,माजी बाल कल्याण सभापती गीता जाधव,मागासवर्गीय सेल रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.उत्तम जाधव,युवक अध्यक्ष नागेश लोखंडे,कैलास पायगुडे, किशोर शिंदे, प्रवीण अंबारले सर्व नगरसेवक नगरसेविका आणि तळेवासी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.                                                 


                                               आपल्या भाषणात सुनील तटकरे यांनी गेली ३५ वर्षे समाजकारण आणि राजकारण करत असताना तळा तालुक्याने नेहमीच साथ दिली तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने पाठिंबा दिला म्हणून म्हणून कॅबिनेट मंत्री ते खासदार पर्यंत मजल मारू शकलो परंतु मधल्या कालखंडात तळा ग्रामपंचायत ते नगरपंचायतीमध्ये सत्ता आणु शकलो नाही याचे शल्य मनामध्ये होते.जानेवारीमध्ये नगरपंचायत निवडणुकीत जाहीर प्रचार सभेत फक्त एक वेळ सत्ता द्या.गेल्या पंधरा वर्षांचा विकासकामांचा बॅकलॉग भरून काढतो असे आश्वासन तळेवासियांना दिले होते तळेवसियांनी मोठ्या विश्वासाने साथ दिली आणि नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता दिली. केवळ तीन महिन्यात तीन कोटी रुपयांचा निधी आणून दिला हा पहिला टप्पा आहे पुन्हा दुसरा तिसरा चौथ्या टप्प्यात याच्यापेक्षा दुप्पट निधी दिला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.                                       गेली १० वर्षे तळा शहर खूप मागे राहिले बाजूला असणारा रोहा तालुका,माणगाव तालुका खूप पुढे गेला परंतु आता शहरातील जनतेने आपली चूक सुधारली असून योग्य नेतृत्वाच्या हाती सत्ता दिल्यामुळे या शहराचा काया पालट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.नव्याने मंजूर झालेली पाणी पुरवठा योजना अंतिम टप्प्यात असून तिचा आराखडा नगरपंचायतीने द्यावा त्यासाठी लागणारा निधी मग तो १० करोड असो किंवा २० करोड निधी देण्याची जबाबदारी सुनील तटकरे याची असेल असे त्यांनी सांगितले.निसर्गरम्य डोंगराळ भागात वसलेल्या तालुक्यात पुरातन वास्तू आहेत तळगड किल्ला, कुडा लेणी यांसाठी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी निधी मंजूर केला आहे त्याचे कामही सुरू झालेले आहे. तालुक्यात रस्त्यांचे जाळे विणले गेले असून अलिबाग तळा ते साई १२५ करोडचा रस्ता मंजूर झाला आहे दळण वळणाची साधने उपलब्ध असून उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.                                            ते पुढे म्हणाले की,एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती अडाणी यांच्यात बैठक सुरू होती या बैठकीमध्ये मी पालकमंत्री अदिती उपस्थित होतो.त्यावेळी पवार साहेबांनी रायगड येथील दिघी पोर्ट येथे कुठला उद्योग होऊ शकतो याची महिती  सुनील तटकरे देतील असे सांगितले त्यावेळी खात्री पटली की भविष्यात येथील भूमी पुत्रांना देखील उदरनिर्वाहासाठी मुंबई ठाणे उपनगरात जाण्याची गरज भासणार नाही येथेच आपल्या भूमीत उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होईल याची खात्री पटली असून त्या दृष्टीने काम सुरू आहे  याचा सारखा दुसरा आनंद कोणता नाही असे सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर अध्यक्ष महेंद्र कजबजे यांनी केले तर आभार उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी मानले.कार्यक्रमासाठी तळा शहरवासीयांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Comments

Popular posts from this blog