भानंग ग्रामपंचायतीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा ग्रामसभेचा ठराव मंजूर

तळा-संजय रिकामे

१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून झालेल्या ग्रामसभेत भानंग ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा ग्रामसभेचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.१९ मे रोजी झालेल्या या सभेसाठी भानंग ग्रामपंचायतीचे सरपंच रघुनाथ वाघरे,उपसरपंच सौ.सुहानी भौड, सदस्य नाना दळवी, लक्ष्मण काते,सौ.सुलोचना रेवाळे,सुप्रिया पागार,कृषी मंडळ अधिकारी सागर वाडकर,कृषी पर्यवेक्षक प्रताप कदम,वरिष्ठ लिपिक दिलीप पाटील, ग्रामसेवक खंडू काळे, पत्रकार संजय रिकामे,जिल्हा शांतता कमेटी सदस्य दामोदर काते पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                    विनापरवानगी बांधण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामांमुळे गावातील नागरिकांना अडचणी निर्माण होऊन गावाला बकाल स्वरुप प्राप्त होते हे लक्षात घेऊन भानंग ग्रामपंचायतीने १९ मे रोजी घेतलेल्या ग्रामसभेत  स्वार्थी वृत्तीने अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला.या पूर्वी अनधिकृत केलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यात येईलच व अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे आढळल्यास धडक कारवाई करण्याचे निर्देश यावेळी सरपंच रघुनाथ वाघरे यांनी दिले.                                                                     गाव पातळीवर अनधिकृत बांधकामांना अभय देण्याचे काम स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यामार्फतच केले जाते. व्होट बँकेसाठी चालणार हे राजकारण संविधानापेक्षा मोठे नसल्यानेच कायद्यानेच त्यांना हतबल करणे योग्य ठरते भानंग ग्रामपंचायतीमध्ये मंजूर झालेल्या या ठरवामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर ग्रामपंचायत मार्फत कारवाई होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून या ठरावामुळे अनधिकृत बांधकाम करून मनमानी करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे.या ठरावाचे सर्वांनी स्वागतच केले.                                                                 ग्रामसभेला लोकनियुक्त सरपंच रघुनाथ वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेला सुरवात करण्यात आली ग्रामसेवक खंडू काळे,पत्रकार संजय रिकामे यांनी १ मे महाराष्ट्र दिनाचे महत्व सांगितले या ग्रामसभेत सन  २०२१-२२ च्या जमाखर्चाचे वाचन करण्यात आले गावातील विविध विकास कामाबद्दल चर्चा, भानंग पाणीपुरवठा अंतर्गत वावे धरण वरून पाणी पुरवठा योजने संदर्भात चर्चा, घनकचरा व्यवस्थापन योजनेविषयी चर्चा, वृक्षलागवड संदर्भात चर्चा,महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी निवड,sc/st बंधुसाठी घरकुल योजना, १५ वा वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याविषयी चर्चा,१० टक्के महिला बालकल्याण वर खर्च,१५ टक्के sc - st बंधुसाठी खर्च, ५ टक्के दिव्यांग खर्च यांवर चर्चा,महिला सबलीकरण वर चर्चा,पाणलोट  समिती निवड,आयत्या वेळचे विषयावर  चर्चा कृषीअधिकरी  यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली,तसेच आरोग्यसेवक यांनी माहिती दिली.अश्या अनेक विषयांवर एकमताने ठराव आज ह्या ग्रामसभेत पारित झाले.

Comments

Popular posts from this blog