ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत कल, अभियोग्यता चाचणी आयोजित करणे हा स्तुत्य आणि स्वागतार्ह उपक्रम- पालकमंत्री आदिती तटकरे 

कोलाड येथे करिअर मार्गदर्शन शिबिरासाठी विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद

रोहा- प्रतिनिधी

विशेषतः शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सुमारे तीन हजार रुपये खर्च करून घेतली जाणारी, कल-अभियोग्यता चाचणी आज रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध केली जात आहे, हा आयोजकांनी घेतलेला स्तुत्य आणि स्वागतार्ह उपक्रम असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. त्या कोलाड तालुका रोहा येथे सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या द.ग.तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित विद्यार्थी कलचाचणी व करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्धघाटन करताना बोलत होत्या .आपण स्वतः व आमदार अनिकेतभाई तटकरे शिक्षण घेत असताना आपल्याला अशा प्रकारच्या उपक्रमांचा लाभ घेता आला नाही. मात्र आत्ताची पिढी खूप भाग्यवान आहे. आपण कोणते शिक्षण घ्यावे व कोणत्या क्षेत्रात करिअर करावे यासाठी मार्गदर्शन उपलब्ध होत आहे.रायगड जिल्ह्यात सात ठिकाणी हा उपक्रम कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 24 मे 2022 ते गुरुवार दिनांक 26 मे 2022 दरम्यान या उपक्रमाचे आयोजन कोलाड हायस्कूल मध्ये करण्यात आले आहे.

 आज मंगळवार दिनांक 24 मे 2022 रोजी या करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्धघाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर त्यांचे समवेत शहर अध्यक्ष अमित उकडे,महिला अध्यक्षा प्रितम पाटील, राकेश शिंदे, संजय मांडलुस्कर, महेंद्र गुजर, सुरेश महाबळे,माज सवाल, विद्यार्थी अध्यक्ष अक्षय नागोठणेकर, नवनीत डोलकर,रविना मालुसरे-भोसले,माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. शेडगे, रोहा गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

दहावी आणि बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना पुढे काय करायचे हा प्रश्न भेडसावत असतो. कोणती साईट निवडावी, करिअरची दिशा कशी ठरवावी, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसते. याकरताच या करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता दहावी व बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरीता चाचणीचे आयोजन करून सदर विद्यार्थ्यांची आवड,त्यांच्यातील गुण आणि करिअर म्हणून एखादे क्षेत्र निवडण्यासाठी मदत मिळणारी ही अॕप्ट्युटेड टेस्ट असणार आहे.

सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.

या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

कलचाचणी, अभियोग्यता चाचणी तसेच करिअर मार्गदर्शन शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी 

पुढील क्रमांकावर संपर्क साधावा-

१) रविना मालुसरे-भोसले - 7887402011

२) अक्षय नागोठणेकर 9011218149

३) माज सवाल- 8237595488

४) असावरी मोकल 7887357791

Popular posts from this blog