पिंगळसई ता.रोहा येथील प्रेमळ स्वभावाच्या सौ.कमल नारायण देशमुख यांचे दुःखद निधन

सामाजिक कार्यकर्ते जगदीश देशमुख यांना मातृशोक

रोहा-प्रतिनिधी

आपल्या प्रेमळ स्वभावाने परिसरात सुपरिचित असलेल्या सौ.कमल नारायण देशमुख यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले.गुरुवार दिनांक १९ मे २०२२ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या अंतयात्रेसमयी राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच समाजातील विविध स्तरावरील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक २८ मे २०२२ रोजी सकाळी ठिक ८ वा.३० मिनिटांनी जानकी घाट,जोगेश्वरी मंदिर पिंगळसई ता.रोहा येथे होईल.तर उत्तरकार्य मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी पिंगळसई निवासस्थानी होणार आहेत.

सौ.कमल नारायण देशमुख यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून त्यांचे सुपूत्र सामाजिक कार्यकर्ते श्री.जगदीश देशमुख व कुटूंबियांची अनेक मान्यवरांनी भेट घेऊन सांत्वन केले आहे.

Comments

Popular posts from this blog