शेनाटे प्रकरणात नवा पेच, अजून दोन आरोपी वाढण्याची शक्यता.
तळा -संजय रिकामे
तळा येथील शेनाटे गावाजवळ दिनांक 23 मे 2022 रोजी दुपारी साधारण 12.00 वाजण्याच्या सुमारास दिनेश बटावले यांना रिक्षा घेऊन जाताना जबर मारहाण करण्यात आली होती. ते गंभीर जखमी असल्याने त्यांना मुंबई येथे तातडीने हलवण्यात आले होते. मारहाणीमुळे त्यांची तब्येत जास्त खालवल्याने त्यांची मृत्युशी चाललेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा मुंबईत मृत्यू झाला. यातील एक बाब महत्वाची आहे, ती म्हणजे त्यांचा मृत्यू पूर्वीचा मुंबईतील जबाब, त्या जबाबात माझ्यावर चार जणांनी हल्ला केला होता. मी शेनाटे ते तळा असा प्रवास करत असताना चौघानीं म्हणजे गणेश बटावले, भास्कर कारे, रुपेश बटावले आणि राकेश बटावले यांनी माझ्यावर हल्ला केला आणि मला स्मशानाजवळ नेऊन बरीच मारहाण केली. त्यांच्या जवळ असलेल्या लोखंडी रॉड, लाकूड, दगडाने माझ्या डोक्यात, छातीवर, पायावर दुखापत केली. अजून बरीचशी सविस्तर माहिती मारणापूर्वीच्या जवाबत दिनेशने नोंदवली आहे. मात्र प्रत्येक्ष दर्शिने आपल्या जवाबत फक्त दोघांची म्हणजे रुपेश बटावले आणि गणेश बटावले यांचीच नाव तळा पोलीस ठाण्यात जवाबदरम्यान दिली आहेत. सध्या स्थितीत हे दोन्ही आरोपी तळा पोलिसांच्या ताब्यात आहेत.
दिनांक 23 मे 2022 रोजी रात्री उशिरा दिनेशचे पार्थिव तळा पोलीस ठाणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणण्यात आलं. त्यावेळी ग्रामस्थानी दिनेशने मुंबईत दिलेल्या जबाबप्रमाणे चौघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जो पर्यंत उरलेल्या दोघांवर म्हणजे भास्कर कारे आणि राकेश बटावले यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही तोवर आम्ही पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी मागणी करण्यात आली. पोलिसांनी सर्व परिस्थिती पाहता सर्वाना शब्द देत कारवाई करू असे जमलेल्या ग्रामस्थांना सांगितले.त्या नंतर दिनेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले.आता तळा पोलीसांसमोर दोन जबाबच्या अनुषंगाने आव्हान उभे राहिले आहे. तळा पोलीस उरलेल्या दोन आरोपीवर काय कारवाई करणार आणि दिनेशला कसा न्याय मिळवून देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment