शेणाटे ता.तळा येथे मागील भांडणाच्या रागातून रिक्षा चालकास जबर मारहाण
जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
तळा -संजय रिकामे
शेणाटे येथे मागील भांडणाच्या रागातून एका रिक्षा चालकास जबर मारहाण करण्यात आली असून जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना तळा तालुक्यात घडली आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार शेणाटे येथील दिनेश बटावले हे रिक्षातून तळा येथे येत असताना मौजे खांबवली गावच्या स्मशानभूमीजवळ आरोपी रुपेश बटावले व गणेश बटावले हे अचानक रिक्षाच्या समोर येऊन त्यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करीत दिनेश बटावले हे बसलेल्या रिक्षाची समोरील काच दगड मारून फोडली.तसेच रिक्षा चालक बाहेर पडल्यानंतर दोन्ही आरोपींनी दिनेश बटावले यांना बाहेर काढून हाता बुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी दिनेश बटावले यांना जवळच असलेल्या स्मशानभूमीजवळ ढकलत घेऊन जात त्यांना खाली पाडले व दोन्ही आरोपींनी मोठमोठ्या दगडांनी त्यांच्या उजव्या पायावर मारून पाय मोडला शिवाय डोक्याला देखील गंभीर दुखापत करून दमदाटी केली व तेथून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी घटनास्थळी धाव घेतली.जखमीला तातडीने तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता दुखापत गंभीर असल्याने जखमीला मुंबई येथील सायन रुग्णालयात हलविण्यात आले परंतु उपचारादरम्यानच दिनेश बटावले यांचा मृत्यू झाला.याबाबत तळा पोलिस ठाण्यात आरोपींवर गु.र.नं.४८/२०२२ भा.द.वी.सं.कलम ३२६,४२७,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार आर.बी.बांन्द्रे हे करीत आहेत.
हे सर्व कलम छोटे का टाकले आरोपीला लगेच जामीन होईल 302 कलम का नाही जीव गेला आहे ऐका गरिबाचा
ReplyDelete