तळा परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न

तळा -संजय रिकामे

मागील सरकारच्या काळात विकास खुंटला होता. राज्य शासनाकडून शहर आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी मदत मिळाली नव्हती. परंतु राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी तळा शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणण्यास सुरुवात केली असताना ग्रामीण भागात देखील विकासकामे जोमाने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कासेवाडी येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे आणि कासेवाडी येथील अंतर्गत रस्त्याचे उद्धघाटन त्याचप्रमाणे शेणाटे येथील अंगणवाडीचे उद्धघाटन पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते पार पडले.                        

      विकासकामांच्या उद्धघाटना निमित्ताने ग्रामस्थांनी केलेल्या मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन ना.अदिती तटकरे यांनी यावेळी दिले.आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की तटकरे साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यापासून या तालुक्याला झुकते माप दिले.श्रीवर्धन मतदार संघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली यात तळा तालुक्याचा खूप मोठा वाटा आहे.म्हणूनच अनिकेत भाई असेल मी असेन आम्हा दोघांना विकासकामांचा झंझावात या तालुक्यात आणि जिल्ह्यात कायम ठेवता आला यात आता खंड पडणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.   
                       या उद्धघाटन समारंभास राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष नाना भौड,महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे, मागासवर्गीय सेल रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.उत्तम जाधव, रा.जि.प.सदस्य बबन चाचले, समन्वय समिती अध्यक्ष चंद्रकांत राऊत,शेणवली ग्रामपंचायत सरपंच निकिता गायकवाड,युवक अध्यक्ष नागेश लोखंडे,कैलास पायगुडे,जगदीश शिंदे,संदेश वाजे ग्रामस्थ महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog