महुरे गाव मूलभूत सोई सुविधांपासून कधीही वंचित राहणार नाही- आ.अनिकेत तटकरे

तळा- संजय रिकामे

सामाजिक विकास योजनेंतर्गत महुरे येथील रस्त्याच्या कामाचे उद्धघाटन व जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आ.अनिकेत तटकरे यांच्या शुभ हस्ते महूरे येथे पार पडले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी ग्रामस्थांना मूलभूत सोई सुविधांपासून कधीही वंचित ठेवणार नाही असे आश्वासन यावेळी दिले. या उद्धघाटन व भूमिपूजन सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नाना भौड, माजी बालकल्याण सभापती गीता जाधव,माजी पं.स. सभापती अक्षरा कदम,माजी सरपंच विठोबा साबळे, मागासवर्गीय सेल रायगड जिल्हा अध्यक्ष उत्तम जाधव,कैलास पायगुडे महुरे ग्रामस्थ महिला मंडळ मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

              आ.अनिकेत तटकरे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,महुरे नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे. तळा तालुक्याची निर्मिती होण्याआधी खासदार तटकरे साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यापासूनच या गावातील विकास कामे मार्गी लागत आली आहेत. महुरे येथील नागरिकांनी सुध्दा नेहमीच खा. तटकरे साहेब, पालकमंत्री ना.अदिती तटकरे व मला पाठबळ दिले आहे. त्याची कृतज्ञता म्हणून हे गाव मूलभूत सोई सुविधांपासून कधीही वंचित राहणार नाही, यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.                                               

        महुरे येथील रस्त्याच्या कामाचे उद्धघाटन व जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आ.अनिकेत तटकरे यांच्या शुभ हस्ते होणार असल्याने आज महुरे गावात मुंबईकर आणि ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती विशेष करून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.महुरे ग्रामस्थांनी आ.अनिकेत तटकरे यांचा सत्कार करून केलेल्या विकासकामांसाठी त्यांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महूरे ग्रामस्थ आणि मुंबईकर यांनी खूप मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog