सुतारवाडी परिसरात लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले जाणार-खासदार सुनिल तटकरे

कोलाड -श्याम लोखंडे

 रोहा तालुक्यातील सुतारवाडी परिसरात लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले जाईल तसेच याबाबत पालकमंत्री अदितीताई तटकरे यांनी या कामासाठी मंजुरी दिली असून लवकरच कामाची निविदा निघून कामाला सुरुवात होणार असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी येथे विविध विकास कामांचे उद्‌घाटन आणि भूमिपूजनाच्या  शुभारंभाच्या वेळी सांगितले. या ठिकाणी भव्य असा वनौषधी उद्यान सुद्धा लवकरच होणार असून वनऔषधी उत्पादन पाहण्यासाठी देशाच्या काना कोपऱ्यातील पर्यटक या ठिकाणी येथील असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

           सुतारवाडी परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र झाल्यानंतर हजारो नागरिकांना फायदा होईल. सुतारवाडीसह येरळ, धगडवाडी, विजयनगर, कामथ, सावरवाडी, ढोकलेवाडी, जामगाव, जाधववाडी, पाथरशेत, जावटे, कुडली, अंबिवली, दुरटोली, नारायणगाव, अनेक ठिकाणच्या आदिवासीवाड्या आदिंना लाभ घेता येईल. सध्या सुतारवाडी येथे उपकेंद्र आहे आणि कोलाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.  एखादी व्यक्ती आजारी पडली किंवा अपघात झाला तर दहा ते पंधरा कि.मी. अंतर पार करुन कोलाड प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते.

त्यामुळे रुग्णांचे किंवा अपघात ग्रस्तांचे खूपच हाल होतात. मात्र आता या समस्या लवकरच मार्गी लागणार असल्याने नागरिकांनी खासदार सुनिल तटकरे तसेच रायगडच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे आणि आमदार श्री. अनिकेत तटकरे यांना धन्यवाद दिले.               

 रात्री अपरात्री विंचू किंवा सर्पदंश झालेल्यांना कोलाड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्र गाठावे लागत असे. यापुढे ही समस्या ही आता दूर होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील असंख्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Comments

Popular posts from this blog