डॉ.अपुर्व भट यांनी दिले रुग्णांना जीवनदान 

आधुनिक तंत्रज्ञान वापरून यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव 

रोहा-प्रतिनिधी

रोहे शहरात वैद्यकीय सेवेत नव्यानेच दाखल झालेले ,रोहे शहरातील जुने जाणते व निष्णात स्त्री रोग तज्ञ डॉ .रघुनाथ भट यांचे सुपुत्र डॉ .अपुर्व भट यांनी नुकतेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णांना जीवनदान दिले .

काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी रक्ताच्या उलट्या होत असलेला पेशंट त्यांच्याकडे आणण्यात आला त्याचे पल्स देखील व्यवस्थित लागत नव्हते ,पोटात व अन्ननलिकेत रक्ताचे थारोळे झाले होते डॉ .अपुर्व यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांची एन्डोस्कोपि केली व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून रक्तस्त्राव थांबवला व त्यांना पुढील ट्रीटमेंट दिली व स्ट्रेचर वर आलेला रुग्ण चालत घरी गेला. 

अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया नवी मुंबई येथे होतात ,डॉ.अपुर्व भट यांनी त्या शस्त्रक्रिया रोह्यात यशस्वीपणे केल्या. 

डॉ .अपुर्व भट हे एम .एस .जनरल सर्जन असून आधुनिक पद्धतीने  दुर्बिणीद्वारे कॅन्सर शस्त्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले आहॆ. 

डॉ.अपुर्व भट हे आता आपले शिक्षण व प्रशिक्षण पुर्ण करून वैद्यकीय सेवेसाठी रोह्यात दाखल झाल्याने रोहे शहर व परिसरातील रुग्णांसाठी ते आधारवड ठरणार असून अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आता रोह्यात होणे शक्य होणार आहॆ. 

रोहे येथे वैद्यकीय सेवेस प्रारंभ केल्यानंतर त्यांनी दुर्बिणीद्वारे हार्नियाची शस्त्रक्रिया ,दुर्बिणीद्वारे फुटलेली रक्तवाहिनी बंद करण्याची शस्त्रक्रिया ,गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया ,लेप्रोस्कोपि ,इंडोस्कॉपी ,आदी किचकट व आव्हानात्मक शस्त्रक्रिया व तपासण्या यशस्वीपणे केल्या आहेत. 

मनाने अत्यंत निर्मळ असलेले डॉ.अपुर्व रुग्ण समुपदेशनावर देखील आधिक भर देत असून रुग्णांच्या मनातील त्यांच्या आजारांविषयीची भीती घालवण्यात देखील यशस्वी ठरले असून त्यांच्याकडे येणारे रुग्ण हे सकारात्मक द्रुष्टीकोन घेऊन जात आहेत त्यामुळे अल्पावधीतच तनाबरोबरच मनाची चिकित्सा करण्याचे कसबही त्यांनी प्राप्त केले आहॆ. 

एन्डोस्कोपी ,कोलोनोस्कॉपी यांसारख्या तपासण्या रोह्यात पूर्वी होत नसत ,डॉ.अपुर्व यांनी या तपासण्या रोह्यात चालू केल्याने त्यासाठी रुग्णांची व त्यांच्या कुटुंबीयांची मुंबई ,पुणे यासारख्या शहरांमध्ये होणारी फरफट आता थांबली आहॆ. 

रोह्यासाठी व रायगडवासियांसाठी या निमित्ताने अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयी सुविधांनी सुसज्ज असे वैद्यकीय दालन सुरू झाले असून गरजू रुग्णांसाठी हे दालन नक्कीच वरदान ठरेल यात शंका नाही.

Comments

Popular posts from this blog