घोसाळे मध्ये रंगला बैलगाडी शर्यतींचा थरार
शर्यतींना उत्स्फूर्त प्रतिसाद
बैलगाडी शर्यत रसिकांची अलोट गर्दी
रोहा-प्रतिनिधी
गेले अनेक वर्षे बैलगाडी शर्यतीं वर असलेली बंदी शासनाने उठवली, त्यामुळे बैलगाडी शर्यत शौकिनांच्या आनंदाला पारावार उरला नाही. जिथे शर्यती असतील तिथे आपली राजा-सर्जाची बैलजोडी घेऊन शर्यत प्रेमी उपस्थिती लावू लागले आहेत.
शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, किल्ले घोसाळगडाच्या परिसरात आपल्या पुरातन परंपरांचा ठेवा जतन करण्याचा प्रयत्न नेहमीच होताना दिसत आहे. आधुनिकतेच्या जमान्यात सुद्धा खिल्लार बैलांची जोपासना करून आपल्या मातीतला रांगडा खेळ जोपासण्याचे काम अत्यंत आनंदाने परिसरातील ग्रामस्थ करताना दिसत आहेत.
शेतीच्या कामांतून थोडी उसंत मिळाल्यावर मनोरंजन-विरंगुळा म्हणून, आपल्या ग्रामदेवतांच्या उत्सवांमध्ये बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणे हा आपल्या परंपरेचा एक भाग आहे.
मोबाईल गेमच्या व्हर्च्युअल विश्वात अडकलेल्या आजच्या तरुणाईला हा जीवंत थरार अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली ती रोहा तालुक्यातील घोसाळे गावाने.
घोसाळे गावचे ग्रामदैवत श्री कालभैरवाच्या वार्षिक उत्सवानिमित्त नवतरुण मंडळ भैरीची आळी- मुंबई ,श्री गुरुदत्त आदर्श सेवा मंडळ भैरीची आळी आणि ग्रामस्थ मंडळ घोसाळे यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य बैलगाडी शर्यतीचे मंगळवार दिनांक 10 मे 2022 रोजी आयोजन करण्यात आले होते. बैलगाडी शर्यती चार गटांमध्ये पार पडल्या. प्रत्येक गटानुसार क्रमांक पुढील प्रमाणे देण्यात आले.
गट क्रमांक -1
१)गणेश घोसाळकर
२) रोशन गांगल
३)राजा कालेकर
गट क्रमांक -2
१)अभी वाटवे पडम रोहा
२)राकेश चव्हाण तळवली
३)राम शेलार
गट क्रमांक -3
१)अक्षय भोजने
२) अतिश घोसाळकर कवळटे
३) श्लोक लाड सुडकोली
गट क्रमांक- 4
१)सांची कांबळे नांदगाव
२)रमेश गोवर्धने अष्टमी रोहा
३) तन्मय मोरे इंदापूर
४) विकास राऊत दाखणे माणगाव
विजयी स्पर्धकांना आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेतील विजयापेक्षा स्पर्धेत सहभागी होणे अधिक प्रभावशाली होते.त्यामुळे सर्व सहभागी स्पर्धकांचे आयोजकांनी आभार मानले.
बक्षिस वितरण कार्यक्रमासाठी किरण मोरे,प्रतिभा पार्टे, अजय भोसले,चंद्रकांत पार्टे, संतोष पार्टे, चेतना पार्टे, शिवाजी जाधव,रविना मालुसरे-भोसले यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment