"माणुसकी प्रतिष्ठान", शाखा अलिबाग उद्घघाटन सोहळा संपन्न 

रायगड जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे व जिल्हा परिषद समन्वयक श्री.जयवंत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

अलिबाग-प्रतिनिधी

अक्षय तृतिया,मंगळवार दिनांक ३ मे २०२२ रोजी जिल्हा परिषद, रायगड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे   यांच्या शुभहस्ते व जिल्हा परिषद, रायगड समन्वयक श्री. जयवंत गायकवाड यांच्या प्रमुख  उपस्थितीत, "माणुसकी प्रतिष्ठान", शाखा अलिबाग उद्घघाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.सदर कार्यक्रमास माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर संस्थापक अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, शाखा सांगोला अध्यक्ष श्री अतुल कावळे, शाखा पेण अध्यक्ष श्री आशिष कडू, मुख्य शाखा कार्याध्यक्ष श्री तानाजी आगलावे, सचिव श्री विशाल आढाव, गोल्ड कोस्ट सोसायटी अध्यक्ष श्री योगेश घरत तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास श्री वसंत जंजिरकर, श्री रावसाहेब माळी तसेच डॉ. ज्ञानदा फणसे यांच्या मातोश्री यांची विशेष उपस्थिती लाभली.

         माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात.माणुसकी हा माणसाचा दागिना’ आहे.

     मला वाटते की प्रथम ते स्वतःच्या आत एक व्यक्ती बनतात आणि नंतर ते स्वतःला बाहेर प्रकट करतात.माणसाचा मुखवटा घातलेली हजारो व्यक्तिमत्त्व आहेत, दिसतात.

      आज धावपळीच्या युगात आपण साधी माणसं तरी उरलो आहोत की नाही याची शंका आहे. रस्त्यावर अपघात घडताना किंवा घडलेला दिसला तरी आपण न थांबता, त्याच्या मदतीला न जाता ऑफीसला जातो. याला म्हणायची का माणुसकी.रक्तदान करणं, गरजवंताला लोकांना काहीतरी देणं, निसर्गाची जाणीव ठेवणे, ज्यांना ज्या क्षेत्रात पुढे जायचे आहे, त्यांना मार्गदर्शन करणे, मनोरंजनाचे पैसे वाचवून वृद्ध अनाथांना देणे शिक्षणासाठी खर्च करणे पैशासोबतच आपला वेळ देणं हे आपण करू शकतो.


माणसांसोबतच प्राणीमात्रांवर दया करणे, हाही उद्देश आम्ही सोबत घेऊन पुढील वाटचाल करत आहोत.

या शिकलेल्यां आणि पैसेवाल्यांच्या युगात अजुनही बहिणाबाईंची एक ओळसार्थ ठरते,  सर्व जगाला व्यापून टाकते.फक्त बहिणाबाईचे ते शब्द आठवत राहतात ….

"धावा ऐकून न आडला त्याले पाय म्हणू नाही"

रडू ऐकून कानी, नाही फुटला पान्हा, त्याले माय म्हणू नाही

माणुसकी प्रतिष्ठान शाखा अलिबाग उद्धघाटन प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवर आणि अलिबाग शाखेचे सर्व सदस्य यांचे तसेच नविन कार्यकारी मंडळ यांचे मनःपूर्वक आभार. 

माणूसकी प्रतिष्ठान-महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, कार्याध्यक्ष श्री तानाजी आगलावे, सचिव श्री विशाल आढाव तसेच सांगोला शाखा अध्यक्ष अतुल कावळे, पेण शाखा आशिष कडू सर यांचेही मनःपूर्वक आभार. डिजिटल स्किलचे श्री व सौ सोनल हर्शल कदम यांचे हि आभार. तसेच जितनगर वायशेत कार्यालयाचे पदाधिकारी व सदस्य यांचे ही मनःपूर्वक आभार मानले.

संपर्क-

अध्यक्ष- रो.ॲड. भुषण जंजिरकर, ९२०९०९०९११

सचिव- लायन संदीप वारगे, ९२७२६९८९२४

खजिनदार - रो. श्री गौरव माळी, ९२२५७७१९५०

Comments

Popular posts from this blog