मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर वाहनचालकांना लवकरच दिलासा
पोलादपुर-ऋषाली पवार
मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक 66 याचे काम आता लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. गेली तीन वर्ष या महामार्गाचे काम सुरू होते त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच पर्यायी मार्ग कमी रुंदीचा असल्याने अपघात मोठ्या प्रमाणात घडत होते तसेच वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला .
वारंवार होणारे अपघात व वाहतूक कोंडी पाहता आता महामार्गाचे काम अतिशय वेगाने सुरू करण्यात आले आहेत पोलादपूर तालुक्यातील भुयारी कारण देखील जवळ जवळ पूर्ण होत आले आहे. परंतु तोपर्यंत दुसऱ्या बाजूने आणि एक पर्यायी मार्ग काढण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न संबंधित कंपनीकडून सुरू आहेत.
त्यामुळे नागरिकांना वाहन चालकांना होणारा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो तसेच वारंवार होणारी वाहतूक कोंडी तसेच अपघात हे काही प्रमाणात होण्याची शक्यता आहे. हॉर्न मुळे होणारा त्रास तसेच धूळ, माती, गाड्यांमधून निघणारा धूर यामुळे पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. वाहतूक पोलीस व स्थानिक नागरिक दुकानदार व्यावसायिक यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment