श्रीराधाकृष्ण क्रिकेट संघ चरई खुर्द R K चषक २०२२ (पर्व दुसरे) क्रिकेट स्पर्धा संपन्न 

तळा-कृष्णा भोसले

श्री राधाकृष्ण मुंबईकर मंडळ चरई खुर्द पो.तळेगाव ता.तळा रायगड, यांच्या तर्फे श्री RK चषक २०२२ क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेत तळा तालुका विभागातील गवळी समाज १६ संघाने प्रवेश घेतला होता या स्पर्धेमध्ये २ संघ विजेते झाले.


यामध्ये प्रथम विजेता संघ श्री. सोमजाई क्रिकेट संघ भांनगकोड व द्वितीय विजेता श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ बोरीचामाल हे विजेते झाले,या मध्ये फलनदांज- सुरज महाडिक (भांनगकोंड)गोलनदाज-सुयोग महाडिक (भांनगकोंड) मालिकविर-सागर महागावकर (बोरीचामाळ) विजेत्या संघाचं मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेचं सहभागी झालेल्या सर्व संघाचे व  या स्पर्धसाठी उपस्थित मान्यवर आणि आणि ज्या ज्या देणगी दाराने मन मोठं करून स्पर्धेला अनमोल सहकार्य केलं त्या प्रत्येकाचं मनापासून आभारी. मानण्यात आले.या स्पर्धेसाठी कर्णधार सुनील दळवी, उपकर्णधार रोशन दळवी यांनी मोलाचे सहकार्य व विशेष मेहनत घेतली आहे

Comments

Popular posts from this blog