मुलुंड राघवेंद्र स्वामी गार्डन मध्ये होळी उत्सवानिमित्ताने रंगांची उधळण

अबालवृध्द गेले रंगात न्हाऊन

मुंबई / मुलुंड (प)-प्रतिनिधी

मुलुंड पश्चिम येथील राघवेंद्र स्वामी गार्डन मध्ये गार्डनचे कमिटी अध्यक्ष श्री.जयवंत केणी आणि श्री.गुरुराज भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली होळी उत्सव  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी रंगांच्या उधळणीत अबालवृध्द न्हाऊन गेले होते. सदर कार्यक्रमासाठी महिला कार्यकर्त्या सौ. पुष्पा सावळा, सौ. हेमांगी ठाकुर, सौ. आसमा शेख, सौ. भारती साठे, सौ. ज्योती, सौ. प्रिया गुप्ता,  सौ. मेघा साबळे आणि सौ.रिना रविकांत पोटफोडे यांची मोलाची साथ लाभली.

कोरोना नंतर थांबलेले जनजीवन पुन्हा पुर्वपदावर येत आहे.दोन वर्षांच्या प्रदिर्घ विश्रांती नंतर नागरिक होळी सणाचा आनंद लुटताना दिसत आहेत.कोरोनाने जगण्याची किंमत काय असते?हे शिकविले आहे. त्यामुळे जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातुन पाहून आनंद निर्माण करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत आहे.आपल्या पारंपारिक सणांमधून आपुलकीचा नवा संदर्भ शोधुन केलेला जल्लोष, उर्जा निर्माण करणारा ठरत आहे.

व्हिडिओ  पाहण्यासाठी  येथे क्लिक करा.👇👇👇
Comments

Popular posts from this blog