दामोदर काते रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित

 -तळा-कृष्णा भोसले 

तळा तालुक्यातील भानंग कोंड या गावचे सुपुत्र दामोदर काते यांचा रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. स्मृती चिन्ह , मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.



   यावेळी राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, विधानपरिषद शिक्षक आमदार.बाळाराम पाटील,माजी आमदार पंडीतशेठ पाटील, महीला बालकल्याण सभापती गिताताई जाधव यासारखे मान्यवर उपस्थित होते.

दामोदर काते हे यादव साहाय्यक समितीचे (गवळी समाजाचे) माजी सरचिटणीस, विद्यमान रायगड जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य, भानंग ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, गोपाळकृष्ण सेवा मंडळ भानंगकोंडचे जेष्ठ सल्लागार शांत व संयमी नेतृत्व करणारे, भानंग कोंडच्या पाणीपुरवठा समितीचे विद्यमान चिटणीस, मितभाषी व सर्वांना सांभाळून घेणारे, अशा या वेगवेगळ्या कमिटीच्या पदावर काम करणारे   व्यक्तिमत्त्व आहेत. विशेष म्हणजे श्री दामोदर तुकाराम काते यांनी यादव गवळी समाजाचे सलग बावीस वर्षे सरचिटणीस या पदावर काम केले आहे या बावीस वर्षात त्यांनी चार अनुभवी अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठेने व विश्वासाने काम केले यांची रायगड जिल्हा परिषदेने त्यांनी केलेल्या समाज कार्याची नोंद घेऊन त्यांना आज उत्कृष्ट समाजसेवेचा रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील अनेक मान्यवर मंडळीने व त्यांच्या चाहत्यांकडुन त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog