"पंढरपुर,आळंदी प्रमाणे किल्ला गाव तिर्थक्षेत्र कसे होईल, याकरिता निश्चित प्रयत्नशील राहू"- खासदार सुनिल तटकरे

रोहा-शरद जाधव

      आध्यात्मिक विचारसरणीचा पाया किल्ला या गावाने रचला आहे.धाटाव पंचक्रोशीचा आध्यात्मिक इतिहास सर्वत्र ज्ञात आहे. मंदिराच्या सभोवताली  निसर्गरम्य भुमी दिसत आहे. अनेक वर्षांचे हे मंदीर आणि  या मंदिराची रचना पाहता जणू काही हे शिवकालीन मंदीरा प्रमाणे असुन भविष्यात पंढरपुर, आळंदी तिर्थक्षेत्रा प्रमाणे किल्ला हे गाव, श्री वाकेश्वर तिर्थक्षेत्र कसे होईल या करिता प्रयत्नशील राहू  असे अभिवचन खासदार सुनिल तटकरे यानी दिले.



   आमदार अनिकेत तटकरे यांच्या स्थनिक विकास निधीतून निर्माण होत असलेल्या वाकेश्वर सामजिक सभागृहाच्या भुमीपुजना प्रसंगी ते बोलत होते.

         व्यासपिठावर आमदार अनिकेत तटकरे,तालुकाध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर, शंकरराव भगत,राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, रोहिदास पाशिलकर,अनिल भगत,योगेश बामुगडे, सरपंच नरेश पाटील,अमित मोहिते, ज्ञानेश्वर साळुंखे,प्रदीप बामुगडे ,विष्णू लोखंडे,सरपंच रुपेश बामुगडे, जयवंत मुंढे.केशव भोकटे,अरविंद मगर विभागातील सरपंच उपसरपंच,सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



    खासदार सुनिल तटकरे पुढे म्हणाले की," या गावचे अनेक वर्षांपासूनचे आपुलकीचे नाते आहे. स्वर्गीय भगवान बुवा बामुगडे, जनार्दन मुंढे यानी राजकारणात  मोलाची साथ दिली. भाईसाहेब या भागाचे नेतृत्व उत्तमरित्या करित होते. पुढे गावच्या विकासाला चालना मिळाली. पाणी प्रश्न सुटला आहे. किल्ला ते अशोकनगर रस्त्याचे प्रश्न मार्गी लागणार आहे. भविष्यात विकासाच्या बाबतीत चिंता करण्याची गरज पडणार नाही. 

                 1962 साली या वाकेश्वर मंदीराचे जिर्णोध्दार झाले होते. त्यावेळी उत्पन्न कमी होते. सर्वाच्या त्यागातून हे मंदीर उभे राहिले आहे.या पुढे देखणे असे मंदिर उभे करु, तुम्ही वर्गणी गोळा करा कमी वर्गणी झाली तरी चालेल, पुढे लागतील तेवढा निधी मंदिराकरीता देऊ.त्यानंतर परिसर , कडे लक्ष घालू असे तटकरे यावेळी म्हणाले. 

                या पुढे गावाने एकमुखी व एकसंघ राहा. राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरुन मते द्या.घड्याळाच्या गजरचा  आवाज सुतारवाडी पर्यन्त पोहचु द्या! असे आवाहन सुनिल तटकरे यांनी ग्रामस्थांना केले.

     श्री वाकेश्वर हे किल्ला गावचे जागृत देवस्थान आहे.यादरवर्षी मोठा उत्सव भरतो.वाकेश्वर भक्तगंणांच्या सर्व मनोकामना पुर्ण करतो,हा इतिहास आहे. त्यामुळे असे मंदीर आज उभे रहात असल्याने सर्व ग्रामस्थ व महिला वर्ग आवर्जून उपस्थित  होता.

   तर राजकारणातील खडतर प्रवासातून दिल्ली पर्यन्त मजल मारणारे खासदार सुनिल तटकरे यांच्या शुभ हस्ते या मंदिराचे भूमिपूजन झाले.

 हे जागृत देवस्थान असुन या पुढे सुनिल तटकरेंची दिल्ली वारी कोणीच रोखू शकणार नाही, सुनिल तटकरेंचा राजकिय आलेख वाढतच जाणार यासाठी वाकेश्वराकडे प्रार्थना करित असल्याचे ग्रामस्थांच्यावतीने प्रदीप भगवान बामूगडे यांनी पत्रकारांना संगितले 

           तर संपूर्ण रोहा तालुक्यात विकास कामांच्या माध्यमांतून सर्व गावे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोडली जात असल्याचे विविध उध्दघाटन कार्यक्रमांवरुन दिसून येते आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन रविकांत दिघे यांनी केले.

 कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता किल्ला  ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व तरुण मंडळ तसेच  मंदिर जिर्णोध्दार कमेटीने अथक परिश्रम घेतले.


Comments

Popular posts from this blog