धरमसी मोरारजी केमिकल कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह
धाटाव-प्रतिनिधी
औद्योगिक वसाहतीतील धरमसी मोरारजी केमिकल कंपनी या केमिकल्स कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह ५ मार्च रोजी ५१ वा सुरक्षितता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने कारखान्यात सुरक्षितता ध्वज फडकविला तसेच काही आपत्कालीन घटना घडली तर बचावासाठी प्रात्यक्षिके करुन सर्वानी सुरक्षितता संबंधित प्रतिज्ञा घेण्यात आली. संपूर्ण आडवड्यात सुरक्षा स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, कामगाराचे कुटुंब सुरक्षित म्हणजे कामगार सुरक्षित अर्थातच कारखाना सुरक्षित असेल असा प्रमुख उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे कंपनीचे सुरक्षा अधिकारी मॕनेजर अरुण माने यांनी सांगितले.
तर या पूर्ण आठवड्यात केल्या जाणार्या क्रियाकल्पांचा उद्देश्य लोकांना त्यांच्या सुरक्षेसाठी जागरुक करणे आहे. त्याबरोबर कारखान्यात काम करताना सुरक्षिततेची साधने वापरावी तसेच इमरजेंसी कशी हाताळावी, राष्ट्रीय संपत्तीचे जतन आणि संवर्धन याचे देखील महत्व असल्याची जाणीव कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट संभाजी नाना जाधव यांनी कंत्राटी, कायमस्वरूपी कामगार यांना करुन दिली .
तर यावेळी H&R मॅनेजर रमेश राधाराम साहेब, जिओ फ्रॅन्सिस असिस्टंट जनरल मॅनेजर(प्रॉडक्शन) , प्रभात पात्रो मॅनेजर अकाउंट तसेच सतीश वाघोसकर , राकेश खांडेकर, निलेश शेंडगे , सागर जाधव अनिकेत पाटील, केतन पवार तसेच अधिकारी व कामगार उपस्थित होते.
Comments
Post a Comment