रत्नागिरी येथे दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत रायगड संघ ठरला अव्वल
धाटाव- प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे ५ व ६ मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या लेदर बाँल क्रिकेट स्पर्धेत तुफान फलंदाजी व गोलंदाजीच्या जोरावर स्थानिक रत्नागिरी संघावर मात करित रायगड संघाने अव्वल स्थान पटकावले . या स्पर्धेत रायगड, रत्नागिरी अ आणि ब , कोल्हापूर , अहमदनगर व सोलापूर एकुण सह संघानी भाग घेतला होता .
रायगड जिल्हातील दिव्यांग क्रिकेट टिम हि साईनाथ पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली तसेच मंगेश दळवी- ( कोच ), विजय लाड व राजेंद्र कांबळे ( टिम मँनेजर ) यांचे विशेष सहकार्य लाभले. तर स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य रत्नागिरी संघाविरुदध रायगड संघाने प्रथम फलंदाजी करित निरधारीत सहा षटकाच्या सामन्यात ५० धावाचे आव्हान ठेवले होते . यामध्ये शैलेश पाटील , सहदेव बर्डे, कल्पेश ठाकूर हितेश,पाटील, व ऋषिकेश पाटील यांनी फलंदाजीत महत्वपूर्ण योगदान दिले. तर रायगडाने भेदक गोलंदाजी करित केवळ सह षटकामध्ये ३२ धावावर रोखून १८ रन्सने रायगड विजयी ठरला. शैलेश पाटीलने मालिकवीराचा बहुमान पटकविला. विजयी टिम मध्ये मंगेश जाधव - नागोठणे ( कर्णधार ) , शैलेश पाटील - अलिबाग ( उप कर्णधार ), सहदेव बर्डे ( रोहा ), हितेश पाटील ( अलिबाग ), कल्पेश ठाकुर ( नागोठणे), ऋषिकेश येशपाटिल ( रोहा ), संदीप दगडू ठाकुर - पांडापुर ( पेण ), संदीप ठाकूर - आमटेम (पेण ), विलास कदम -आपटा ( पनवेल ), मुकेश पिंगळे ( तळा ) , नितीन महाबंळे ( रोहा ) , शकिल उकये ( म्हसळा ) या सर्व खेळाडुने रायगडच्या टिमचे नेतृत्व केले.
Comments
Post a Comment