द. ग. तटकरे महाविद्यालय तळा येथे जागतिक महिला दिन साजरा

चला मुलींच्या जन्माचे स्वागत करूया कार्यक्रमाचे केले होते आयोजन


तळा-किशोर पितळे 

तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा, नगरपंचायत तळा, कला- वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तळा यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. सुनिता कोकणे व ॲड. सायली दळवी, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत रोडे, सचिव श्री मंगेश देशमुख, गो. म. वेदक विद्यालयाचे चेअरमन श्री महेंद्रशेठ कजबजे, तळा नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. नेहा पांढरकामे, सौ पुष्पा नागे, सौ ग्रीष्मा बामणे, सौ घोलप, सौ पवार, शहर समन्वयक कुमारी अश्विनी यादव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवान लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवान लोखंडे यांनी केले प्रास्ताविकात ८ मार्च २०२२ या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून थीम व घोषवाक्य यास अनुसरण महाविद्यालयात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी चला मुलींच्या जन्माचे स्वागत करूया व आजादी का अमृत महोत्सव या व्याख्यानमाला या दोन उपक्रमांना बेस्ट प्रॅक्टिस म्हणून कार्यान्वित करण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी  ग्रंथालायामध्ये महिलांविषयी विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन नगरसेविका सौ नेहा पांढरकामे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच माहितीपत्रक प्रकाशन, ऑनलाइन सर्वे उद्घाटन, कविता वाचन, निबंध स्पर्धा पोस्टर मेकिंग स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

  डॉ. कोकणे यांनी महिलांचे आजार समज- गैरसमज या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. ॲड. सायली दळवी यांनी महिलांचे कायदे विषयक अधिकार या विषयाची मांडणी केली. या कार्यक्रमासाठी तळा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगरसेविका, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षण संकुलातील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य सेविका यांचा सन्मान करण्यात आला. २०२१ या वर्षांमध्ये ज्या मातांनी कन्येस जन्म दिला त्या कन्यारत्नांचा व माता यांचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी श्री महेंद्रशेठ  कजबजे यांनी मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवरायांचा आदर्श आजही कसा प्रस्तुत आहे व या उपक्रमाकरिता तळा नगरपंचायतीने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. संस्थेचे सचिव श्री मंगेश देशमुख यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा एकूण निर्णय प्रक्रियेतील सहभाग कसा वाढत राहील यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तळा नगरपंचायत शहर समन्वयक कुमारी अश्विनी जाधव यांनी स्पर्धेच्या काळात स्त्रियांनी जीवनात उभं राहण्यासाठी ज्या किमान गोष्टी आवश्यक आहेत त्यांची मांडणी केली. तळा नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ नेहा पांढरकामे यांनी आज महिला सुध्दा पुरुषांच्या बरोबरीने काम करीत असल्याने त्या कुठेही मागे नसल्याचे प्रतिपादन केले.   अध्यक्षस्थानावरून संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे यांनी आजचा दिवस हा महिलांचे विचार ऐकून घेण्याचा दिवस असून आज महिलांचा प्रवेश झाला नाही व त्यांनी कौशल्य आत्मसात केले नाही असे एकही क्षेत्र राहिले नसल्याचे  सांगितले. या कार्यक्रमाचे निवेदन महिला सक्षमीकरण विभाग प्रमुख डॉ तृप्ती थोरात यांनी केले कार्यक्रमाचे स्वागत डॉक्टर दिवाकर कदम, डॉ नानासाहेब यादव, प्रा. नितीन पाटील तर ऑनलाईन सर्वेक्षणाचे निवेदन डॉ. दत्ता कुंटेवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. राजाराम थोरात डॉ. दत्ता कुंटेवाड, श्री विनोद महाजन, श्री मितेश मुळे, ग्रंथपाल मनोज वाढवळ, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. या कार्यक्रमासाठी शिक्षिका, आरोग्यसेविका, कन्यारत्न माता, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog