बोरघरहवेली आदीवासीवाडीत कातकरी उत्थान सप्तसुत्री कार्यक्रमांतर्गत दाखले वाटप
कोविड -१९ लसीकरण व विविध आरोग्य तपासण्या
तळा -कृष्णा भोसले
तळा तालुक्यातील बोरघरहवेली
आदीवासीवाडीवर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचे आदेशाने प्रांताधिकारी वैशाली जाधव दिघावकर आणि तहसिलदार अण्णाप्पा कन्नशेटटी यांचे मार्गदर्शनाखाली कातकरी उत्थान कार्यक्रमाअंतर्गत सप्तसुत्री अभियानांतर्गत आदीवासी बांधवांना विविध दाखले वाटप, सातबारा उतारा वाटप, त्याचबरोबर कोविड १९ लसिकरण आणि आरोग्य तपासणी करण्यात आल्या.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते विलासराव कदम,नायब महसुल तहसिलदार सुरेखा घुगे, मंडळ अधिकारी नेहा तांबडे, बोरघर हवेली सजाचे तलाठी किशोर मालुसरे उपस्थीत होते.
या कार्यक्रमात विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.जातीचे दाखले ९५ , सातबारा उतारा २०, लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.तर याच कार्यक्रमात आदीवासी बांधवांसाठी उत्पन्नाचे दाखले ५ ,जातीचे दाखले प्रकरणे २०, तर संजय गांधी निराधार योजनेच्या १० लाभार्थीचें फॉर्म भरून घेण्यात आले.यावेळी आदीवासी बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याच कार्यक्रमाचे अनुषंगाने आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ गजेंद्र मोधे, मांदाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ तेजस बाबर, महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली आदी वासी
बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यामध्ये१२० नागरिकांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.त्यामध्ये रक्ततपासणी ७०, मोतीबिंदू ३, तपासण्या नागरीकांच्या करण्यात आल्या असुन कोविड १९ही लस २० नागरिकांना देण्यात आली आहे.यामध्ये अनेक विविध तपासण्या करण्यात आलेल्या आहेत.
याकामी आरोग्य सेविका, लॅब असिस्टंट ,आशा , अंगणवाडी कर्मचारी सुरेखा घाडगे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तलाठी किशोर मालुसरे यांनी विशेष मेहनत घेतली.आणि नागरीकांच्या अनेक समस्यांचेही निराकारण केले आहे.
Comments
Post a Comment