इस्माईल भाई पल्लवकर रायगड भुषण पुरस्काराने सन्मानित


तळा-किशोर पितळे

रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणारा रायगड जिल्ह्यातील सर्वोच्च सन्मान म्हणजेच रायगड भूषण पुरस्कार वितरण सोहळा ६ मार्च रोजी अलिबाग येथील पी एन पी नाट्यगृहात पार पडला.तळा तालुक्यातील रहाटाड गावचे ग्रामपंचायत माजी सदस्य,तंटामुक्ती अध्यक्ष,रायगड जिल्हा मुस्लिम वेल्फेअर आँर्गनायझेशन,पोलीस अधीक्षक रायगड, यांचेकडून देखील सामाजिक कार्यात व जातीय सलोखा राखण्यासाठी शासनाला सहकार्य केल्यामुळे सन्मान केला होता व १९९२ साला पासून राजकीय क्षैत्रात योगदान दिलेआहे राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते. सामाजिक क्रिडा सांस्कृतिक कार्यात विविध ठिकाणी  केलेल्या कार्याची दखल घेत इस्माईल भाई पल्लवकर यांना२०२०-२१चा रायगड जिल्हापरिषदेचा अत्यंत मानाचा समजला जाणारा रायगड भुषण पुरस्कार पालक मंत्री मा.अदितीताई तटकरे हस्ते, माजीआमदार पंडीत शेट पाटील, निलिमा पाटील, चित्राताई पाटील शिक्षक आम.बाळाराम पाटील रा.जि.प.अध्यक्षा योगीता पारधी,उपाध्यक्ष सुधाकर घारे, जि.प सदस्या गीताताई जाधव कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थित सन्मान चिन्ह,शाल प्रशस्तीपत्र श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

अशा बहूआयामी योग्य व्यक्तीमत्व असलेल्या इस्माईल भाई पल्लवकर यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल सर्व स्तरावर अभिनंदन केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog