सोनगांव येथे विवाह सोहळ्या निमित्त आमदार अनिकेतभाई तटकरेंची सदिच्छा भेट 


रोहा-शरद जाधव

         रोहा तालुक्यात सध्या विवाह सोहळ्यांचा हंगाम सुरू आहे. सोनगांव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरपंच तुकाराम खांडेकर यांच्या कनिष्ठ कन्येच्या शुभविवाह सोहळ्यास आमदार अनिकेत तटकरे यांनी आवर्जून हजेरी लावून चि.सौ.का. तृषाली व चि.विनायक या वधू- वरांस त्यांनी शुभाशिर्वाद दिले.       यावेळी त्यांच्या समवेत अनंत देशमुख, राकेश शिंदे,जयवंतदादा मुंडे,रविना मालुसरे, हेमंत मालुसरे इ.कार्यकर्ते उपस्थित होते.तर ह्या विवाह सोहळ्यास विनोदभाऊ पाशिलकर,सुरेश मगर, रोहिदास पाशिलकर,आप्पा देशमुख,तानाजी देशमुख, खेळू ढमाळ, महेश तुपकर इ.राजकिय- सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळीनी उपस्थिती लावली.

     यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते चिंतामणी खांडेकर व सुशिल खांडेकर यांनी आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे खांडेकर परिवाराच्यावतीने स्वागत केले. 

            अधिवेशन काळात कार्य व्यस्ततेमुळे अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहता न आल्याने आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी उपलब्ध वेळेत कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देऊन शुभेच्छा देत असल्याचे चित्र रोहा तालुक्यात पहावयास मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog