सानेगांव-यशवंतखार ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.स्वप्नाली संतोष भोईर आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरेंकडून कौतुक 


रोहा-प्रतिनिधी

दैनिक नवराष्ट्र सरपंच सम्राट पुरस्कार २०२२ अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत सानेगाव ता.रोहा येथील सरपंच सौ.स्वप्नाली संतोष भोईर यांची आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.शनिवार दि.२६ मार्च २०२२ रोजी अलिबाग येथे PNP हाॕल मध्ये मान्यवरांच्या उपस्थिती त हा पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला.राज्याच्या मंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते व आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ.स्वप्नाली भोईर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी व्यासपिठावर सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम,जिल्हाधिकारी डाॕ.महेंद्र कल्याणकर,पोलिस अधिकारी अतुल झेंडे इ. मान्यवर उपस्थित होते.तर सरपंच सौ.स्वप्नाली भोईर यांचे समवेत उपसरपंच अपर्णा शामित दिवकर,युवा नेतृत्व संतोष भोईर,पांडूरंग भोईर,विठोबा गुंड,निलेश सुरणकर,सचिन जांभळे,संचिता जांभळे इ.ग्रामस्थ उपस्थित होते.

आपल्या कार्यकाळात सरपंच सौ.स्वप्नाली संतोष भोईर यांनी विकासकामांचा धडाका लावला आहे.कोरोना काळात जन जागृती,ग्रामपंचायत मार्फत मोफत मास्क वाटप केले,सॕनिटायजेशन,लसीकरण केंद्र स्थापन करणे इ.महत्त्वाची कामे केली.तसेच लायन्स क्लब संस्थेकडून ग्रामपंचायत हद्दीतील मोतीबिंदू रुग्णांच्या २२ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या. 

  
वसुंधरा संस्थेच्या सहकार्याने ग्रामपंचायती मार्फत 11 दिवसांचे महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजन केले गेले.बँक ऑफ इंडिया तर्फे 4 दिवसांचे प्रशिक्षण राबविले.कोरोना काळात ग्रामपंचायत मार्फत अदिवासीवाड्यांमध्ये मोफत धान्याचे किट वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ पार्लेश्वर ट्रॅफे मार्फत ग्रामपंचायत मधील सर्व ग्रामस्थांना धान्याचे किट वाटप करण्यात आले.ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांग व्यक्तीना 15 वा वित्त आयोग मधून मानधन देण्यात आले.

आदिवासी बंधूना शबरी योजने मधून घरकुल मंजूर करुन बांधण्यात आली. तसेच नवबौध्द बंधूना रमाई योजने अंतर्गत घरकुल मंजूर करुन बांधण्यात आले. हगणदारी मुक्त गाव करण्यासाठी वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले.

आदिवासीवाडी मधील नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती चे काम केले. 14 वित्त आयोग व 15 वा वित्त आयोग चे कामे पूर्ण केली.15 वा वित्त आयोग मधून यशवंतखार प्राथमिक शाळा डिजिटल केली. सानेगाव नवीन गावठाण मध्ये लाईट चे पोल उभारून नवीन कनेक्शन करुन घेतले. यशवंतखार स्मशानभूमी नवीन पोल व स्ट्रीट लाईट चे काम केले. शासनाच्या अनेक योजनां चे शासनाकडून दिलेले प्रशिक्षण घेतले.सध्या ग्रामपंचायत कार्यालय विस्तार बांधकाम सुरू आहे तरगणपती घाट विसर्जन रस्ता तयार करणे,बंदरआळी वरचा पाडा सामाजिक सभागृह,योगेश म्हात्रे ते अमित ठाकूर यांच्या घरापर्यंत रस्ता करणे,काळकाई मंदिर सुशोभीकरण करणे, वरची आळी महिला कार्यशाळा दुरुस्ती करणे,सचिन जांभळे यांच्या घरापासून ते प्राथमिक शाळा  पेव्हर ब्लॉक बसवणे इ.कामे प्रस्तावित असून यापैकी काही कामे झाली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत.

सरपंच सौ.स्वप्नाली संतोष भोईर ह्यांचे सासर व माहेर यशवंतखार असल्यामुळे गावाशी त्यांची नाळ जोडली गेली आहे.गावातील मोठ्यांचा आदर व लहानांना आपुलकीने त्यांनी जवळ केले आहे.आपल्या कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा त्यांनी उच्चांक केला आहे.खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरेंच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करीत असून त्यांच्याच सहकार्याने आगामी काळात अशीच धडाकेबाज कामगिरी  करणार असल्याचा आशावाद त्यांनी प्रांजलपणे कबुल केला.

सौ.स्वप्नाली भोईर यांचा आदर्श सरपंच म्हणून गौरव झाल्याने समाजाच्या सर्व स्तरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog