बारसोलीमध्ये श्री बापुजीदेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण सोहळा

मान्यवरांच्या स्वागतासाठी बारसोली नगरी सज्ज

खा.सुनील तटकरे, ना.अदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती

धाटाव-शशिकांत मोरे

     रोहा तालूक्यातील श्री बापुजीदेव मंदीराची नव्याने उभारणी केली असल्यामुळे या मंदिराचा प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण सोहळा मोठ्या आनंदमय वातावरणात असंख्य भाविकांच्या साक्षीने मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे.या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असुन सबंध परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.या सोहळ्याला अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने सर्वांच्या स्वागतासाठी बारसोली नगरी सज्ज झाल्याचे पहावयास मिळत आहे.



    या सोहळ्याला रायगडचे खा.सुनील तटकरे,पालकमंत्री ना.अदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे,सुदर्शन केमिकलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशभाऊ राठी,जि.प माजी शिक्षण समिती सभापती भाईसाहेब पाशिलकर,सुदर्शन केमिकलचे व्हाइस प्रेसिडेंट विवेक गर्ग,विजयराव मोरे,मधुकर पाटील,माजी उपसभाती विजयाताई पाशीलकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, रोहिदास पाशिलकर,जयवंत मुंढे यांसह विभागातील ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत.

    रायगड भूषण पुरस्कार प्राप्त हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाखाली रविवार दि.२७ मार्च रोजी सकाळी ६ ते ८ पर्यंत गावातून मूर्तीची पालखी मिरवणूक-ग्रामप्रदक्षिणा होणार आहे तर पुरोहित-श्री वृशिकेश भातखंडे यांच्या देखरेखीखाली प्रायश्चित्त,प्रधान संकल्प,स्वास्तीपुण्याहवाचन,देवता स्थापन जलाधीवास,अग्नी स्थापना,वास्तूयजन,गृहायद्य, पर्यायहोम व दुपारी १२ वाजता धाण्याधीवास, शय्याधीवास तर सोमवार दि.२८ मार्च रोजी स्थापित देवता पूजन,बलिदान पूर्णाहुती,आरती प्रसाद,हरिपाठ व सायं.७ वा.हभप सागर महाराज बोराटे शास्त्री(नातेपुते) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून रात्री ९ ते १० पर्यंत महाप्रसाद होणार आहे .

  या कार्यक्रमासाठी भव्यदिव्य सभामंडप करण्यात आला असून स्वागताच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत.बारसोली ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष नामदेव म्हसकर,उपाध्यक्ष संजय मोरे यांच्या मार्गदशनाखाली दोन दिवसीय कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गावातील संबंध पंच कमिटी तर बापूजिदेव मित्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश पाशिलकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, तरुण वर्ग महिला वर्ग यामध्ये हिरहिरीने सहभाग घेत असल्याचे दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog