तिसे केंद्रस्तरिय शाळापूर्वतयारी मेळावा   मोठ्या उत्साहात संपन्न


रोहा-प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या शाळापूर्वतयारी केंद्रस्तरिय मेळावा केंद्रप्रमुख श्रीम.चंद्रलेखा म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली व तिसे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शैलेश लांबे,तिसे शाळा मुख्याध्यापक श्री.सहदेव कापसे सर,वरसगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री. नथुराम ठाकूर सर,हेटवणे शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन मुसळे सर,तज्ञ मार्गदर्शक व उपक्रम शिल आदर्श शिक्षिका श्रीम.श्रद्धा बिरगावले मँडम,श्रीम.सोनल पाटील मँडम व तिसे केंद्रातील सर्व शिक्षक,पालक,ग्रामस्थ  व दाखलपात्र विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात तिसे शाळेत संपन्न झाला.

प्रथम सत्रात तज्ञ मार्गदर्शक श्रीम.श्रद्धा बिरगावले रा.जि.प.शाळा तिसे यांनी शाळा पूर्वतयारी प्रशिक्षणाची संपूर्ण रुपरेषा सांगून उद्दिष्ट सांगितली ,कोरोना काळात विद्यार्थ्यांचा मागिल तिन वर्षाचा झालेला लर्निंग लाँस भरून काढणे,इ.१ लीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी करणे,शिकविण्यासाठी प्रेरित करण्यासाठी स्वतः साक्षर असलेच पाहिजे हे पालकांना पटवून देणे.

श्रीम.सोनल पाटील यांनी स्वयंसेवकांचे वेगवेगळे कक्ष तयार करून उपलब्ध शैक्षणिक साधनांचा वापर करुन स्वागत कक्षा पासून नियोजनबद्ध विद्यार्थ्यांची क्षमता ठरवण्यासाठी शैक्षणिक कार्ड,साहित्य यांचा वापर करून पालकांचा अभिप्राय घेईपर्यंत संकल्पना स्पष्ट केली.

      ढोलताशांच्या गजरात दाखलपात्र विद्यार्थी, पालकवर्गाची, पाहुण्यांची ,मिरवणूक काढून औक्षण करून स्वागत केले. शिक्षक स्वयंसेवकांनी आपापल्या कक्षात कौशल्ययुक्त साहित्य वापरून, कार्डचा वापर करुन विद्यार्थी पातळी तपासून पालकांशी संवाद साधला.

      मेळाव्यात नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य वापरून सर्व कक्षात विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधत विविध तक्ते,खेळाचे साहित्य वापरून शाळापूर्वतयारी प्रशिक्षण उद्दिष्ट पूर्ण केले.

सूत्रसंचालन श्रीम.श्रद्धा बिरगावले मँडम केले तर आभारप्रदर्शन सौ.अनिता ढाकणे मँडम यांनी केले.

Comments

  1. छान बातमी दिल्याबद्दल तिसे केंद्राच्या वतीने व श्री. सहदेव कापसे राज्य स्तरिय शिक्षकभूषण पुरस्कृत पदवीधर शिक्षक केंद्रीय मुख्याध्यापक रा.जि.प.केंद्र शाळा तिसे व शिक्षकवृंद यांच्याकडून खुप खुप धन्यवाद. व आपल्या चनेलला खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. खूपच छान आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने स्वागत आणि आनंददायी सोहळा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog