यश काळेबेरे युक्रेनहुन मायदेशी सुखरुप परत
तळा तालुका पत्रकार संघाचे वतीने पुष्प्पगुच्छ देऊन स्वागत
तळा-कृष्णा भोसले
तळा शहरातील यश उदय काळबेरे हा युक्रेन येथून सुखरूप आपल्या मायदेशी परत आला.त्याचे तळा तालुका पत्रकार संघातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यश हा एम.बी.बी.एस.करण्यासाठी युक्रेन मध्ये शिक्षणासाठी गेला होता.रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे येथील नागरिक भयभित झाले आहेत.
भारत सरकारच्या ऑपरेशन गंगा या अंतर्गत हे विद्यार्थी मायदेशी सुखरुप परत आले.हे समजताच तळा तालुका पत्रकार संघाने त्यांचे स्वागत केले.
तळा तालुका कार्याध्यक्षा संध्या पिंगळे,सदस्य संतोष जाधव व सचिव श्रीकांत नांदगावकर यांनी त्यांची मुलाखत घेऊन आत्मयतेने विचारपूस केली.
खुप सुंदर
ReplyDelete