चरईखुर्द व वांजलोशी आदिवासीवाडी येथे कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत दाखले वाटप कार्यक्रम संपन्न 

तळा -कृष्णा भोसले

 तळा तालुक्यातील चरईखुर्द व वांजळोशी आदीवासी येथे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर व यांचे आदेशाने प्रांताधिकारी वैशाली जाधव दिघावकर यांचे मार्गदर्शनाखाली तळा तहसिलदार अण्णाप्पा कन्नशेटटी यांचे देखरेखिखाली कातकरी उत्थान कार्यक्रमाअंतर्गत सप्तसुत्री अभियानांतर्गत विवीध दाखले वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  या कार्यक्रमाला नायब तहसीलदार स्मिता जाधव आणि मंडळ अधिकारी विनायक सुतार, तलाठी गणेश सोनावणे यासह महसुली कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात चरईखुर्द आदीवासीवाडी सातबारा २० वाटप, जातीचे दाखले ७उत्पन्नाचे दाखले ४अशा विविध दाखले वाटप करण्यात आले. तसेच वांजळोशी आदीवासी वाडीवर ७/१२ हे२० आदीवासी बांधवांना वाटप करण्यात आले.काही दाखले कागदपत्रे माहिती गोळा करण्यात आली आहे नविन ७ प्रकरणे दाखले तयार करण्यात आली आहेत..येथे विविध दाखले ९८ टक्के नागरिकांना या आधीच वाटप करण्यात आली आहेत.या कार्यक्रमाला अनुसरून प्रा.आरोग्य केन्द्र मांदाड वैद्यकीय अधिकारी डॉ बाबर यांचे उपस्थितीत आदीवासी बांधवांची आऱोग्य तपासणी करण्यात आल्या आहेत.या कार्यक्रमाला आदीवासी वाडीवर नागरीकांनी प्रतिसाद चांगला दिल्याचे तलाठी गणेश सोनावणे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog