जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोठ खुर्द ग्रामपंचायती मध्ये हळदी-कुंकू कार्यक्रम साजरा

महिलांना कापडी पिशव्या भेट देऊन दिला पर्यावरणाचा संदेश 


रोहा-शरद जाधव

रोहा तालुक्यातील रोठ खुर्द ग्रामपंचायतीमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हळदी- कुंकू कार्यक्रम बहूसंख्य महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी उपस्थित महिलांना कापडी पिशवी भेट देऊन पर्यावरणाचा संदेश दिला.

           सदर कार्यक्रमाला रोहा तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा प्रितमताई पाटील,राष्ट्रवादी युवती अध्यक्षा रविना मालुसरे व महिलावर्ग मोठ्या संख्येने  उपस्थित होता.

उपस्थित मान्यवराचे सरपंच गीताताई जनार्दन मोरे यांनी स्वागत व सन्मान केला

      यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना प्रितमताई पाटील यांनी,"तुम्ही आज या ठिकाणी बहूसंख्यने उपस्थित  राहिलात, आज महिला दिन आहे. आजचा हा दिवस महिलांकरिता आनंदाचा दिवस आहे आणि रोठ ग्राम पंचायतीने या महिला दिनाचे औचित्य साधून हळदी कुंकू कार्यक्रम ठेवला हा चांगला योग सरपंच गीताताई मोरे व ग्रामपंचायत उपसरपंच व महिला सदस्या यांनी जुळवून आणला.आज महिलांना 50 टक्के आरक्षण आहे .त्याप्रमाणे महीलांनी केवळ चूल आणि मुल न सांभाळता सामजिक, राजकिय तसेच इतर  क्षेत्रात पुढे गेले पाहिजे. आपल्या लाडक्या नेत्या पालकमंत्री आदितीताई यानी अल्पावधीतच मंत्री म्हणून उमटवलेला ठसा हा आपल्याला अभिमानास्पद असल्याचे गौरवोदगार  प्रितमताई पाटील यांनी काढले.



   तर पर्यावरण वाचवायचे असेल ,प्रदूषण टाळायचे असेल तर प्लॕस्टिक वापरणे टाळा हा संदेश देण्याकरिता कापडी पिशवी वापरा हा संदेश देण्याकरिता उपस्थित महिलांना दर्जेदार अशा कापडी पिशवी चे वाटप करण्यात आले या उपक्रमाबद्दल ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे.         

                कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच सौ.गिताताई जनार्दन मोरे,उपसरपंच सुनिता मंगेश मोरे ,ज्योती प्रकाश डाके,मेघा अमोल ढ़माले,हर्षाली महेंद्र कांबळे  व महिला मंडळाने अथक मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog