तिसे शाळेत विद्यार्थ्यांसाठी कोरोनो लसीकरण कार्यक्रम संपन्न
रोहा-प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषद शाळा तिसे येथे मंगळवार दि.२९/०३/२०२२ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी मार्फत १२ वर्षावरील विद्यार्थ्यांचे कोरोनो लसीकरण करण्यात आले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.श्री.वारे,डॉ. गायकवाड आरोग्य सेविका मखर मॕडम,आशासेविका सौ.कदम मँडम उपस्थित होत्या.त्यांनी योग्य प्रकारे १२ वर्षावरील विद्याथ्यांचे लसीकरण पूर्ण केले.
कोरोनो लसीकरणासाठी शाळेत आल्याबद्दल व डॉ. वारे, डॉ. गायकवाड व मखर मँडम यांचा तिसे केंद्रीय शाळेकडून मुख्याध्यापक श्री.कापसेसर यांचेहस्ते त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार सत्कार करण्यात आला.
आंबेवाडी सरकारी दवाखान्यातील डॉ. वारे निवृत्त.
डॉ.वारे हे आपल्या वैद्यकीय सेवेतील ३७ वर्ष सफल सेवा पुर्ण करुन दि.३०/०३/२०२२ रोजी निवृत्त होत असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत ते सेवा देत होते.श्री.कापसेसर यांनी डॉ.वारे यांना पुढील आयुष्यासाठी सुख,शांती,उत्तम आरोग्य लाभो,अशा शुभेच्छा दिल्या. डॉ.वारे यांनी सत्काराला उत्तर देताना, आपण केलेल्या सेवेबद्दल सांगितले. डॉ.वारे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना श्रीवर्धन, पेण व रोहा तालुक्यातील आरोग्य केंद्रात काम केले.व बढती घेऊन मी निवृत्त होत आहे.मला खुप चांगली सेवेची संधी मिळाली असे सांगितले.आपला सत्कार केल्याबद्दल शाळेतील शिक्षकांना धन्यवाद दिले व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.
तिसे शाळेतील उपक्रमशील आदर्श शिक्षिका श्रीम.श्रद्धा बिरगावले यांनी आपल्या खास शैलीत सूत्रसंचालन केले तर शेवटी तिसे शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सौ.अनिता ढाकणे मँडम यांनी सर्वाचे आभार मानले.
Comments
Post a Comment