द.ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, तळा येथे जागतिक मराठी भाषा दिन साजरा

तळा : कृष्णा भोसले

दिनांक २७ फेब्रुवारी हा दिवस कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस  जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून मराठी विभागाच्या वतीने कवी कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.महाविद्यालयाच्या रंगमंचावरी हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी संस्थेची सचिव मा. मंगेश देशमुख यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.नानासाहेब यादव यांनी केले यावेळी बोलतांना त्यांनी मराठी भाषा संत ज्ञानेश्वरांनी रुजवली तर संत एकनाथ, संत गोरोबा काका, संत चोखा मेळा, संत नामदेव आदी संतानी ती वाढवली असे सांगितले.याच प्रमाणे मराठी भाषा समृद्ध करणाऱ्या अनेक परंपरा त्यांनी सांगितल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव मा.मंगेश देशमुख यांनी भूषविले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.भगवान लोखंडे यांनी मानले.यावेळी प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तसेच जागतिक मराठी भाषा निमित मराठी विभागाच्या वतीने तीन दिवसीय ऑनलाईन व्याख्यांनाचे आयोजन करण्यात आले. मराठी भाषा ही ज्या ज्या घटकांनी समृद्ध होत असते त्यापैकी पुस्तक निर्मितिप्रक्रिया, भाषा:नोकरीच्या संधी,विश्वकोश: माहिती आणि महत्व या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.

दि.२८ फेब्रुवारी रोजी मा.बाळासाहेब घोंगडे, प्रकाशक अक्षर वाड्मय, पुणे यांचे पुस्तक निर्मितिप्रकिया या विषयावर व्याख्याने झाले.यावेळी त्यांनी पुस्तक निर्मितिप्रक्रिया कशा पद्धतीने होत असते हे आपल्या अनुभवातून सांगितले. आपल्या हातात पुस्तक पडते परंतु हे पुस्तक वाचकांच्या हाती येण्यासाठी जवळपास १७ प्रकारचे लोक काम करत असतात त्यांचे श्रम आणि संवेदनशीलतेतून हे आकाराला येत असते असे सांगितले.

दि.१ मार्च रोजी सौ.मालन वाडेकर यांचे भाषा: नोकरीच्या संधी याविषयावरती व्याख्यान संपन्न झाले.यावेळी बोलतांना त्यांनी आता विद्यार्थ्थांनी आता बहुभाषिक होण्याची गरज असून किमान ३ ते ४ भाषा आल्या पाहिजे असे सांगितले. त्याच प्रमाणे मराठी भाषेतून शिक्षण घेतल्यानंतर पत्रकार, मुद्रितशोधन, पुस्तकनिर्मिती, संवादलेखन, रेडीओ जॉकी, अनुवाद याच प्रमाणे अनेक क्षेत्रात नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगितले.

दि.२ मार्च रोजी प्रा.डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर यांचे विश्वकोश : माहिती आणि महत्व या विषयावर व्याख्यान झाले.त्यांनी बोलताना मराठी विश्वकोश निर्मिती कोणत्या उद्देशाने झाली  ते सांगून मराठी भाषेला समृद्ध करण्यात या कोशांचे महत्व मोठे असल्याचे सांगितले. तसचे आता प्रर्यंत २० विश्वकोश तयार झाले असून २१ साव्या खंडाचे काम सुरु असल्याचे सांगितले.विश्वकोश खंड तयार करण्यात वाई येथील ग्रंथालयाचा वाटा मोठा असलायचे सांगितले.वरील तीनही व्याख्यांनाचे प्रस्ताविक आणि पाहुण्यांच्या परिचय मराठी विभाग प्रमुख डॉ.नानासाहेब यादव यांनी केले तर आभार डॉ. तृप्ती थोरात यांनी मानले. सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्याथी यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली. संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि महविद्यालयाचे प्राचार्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog