बारसोली कातकरीवाडीमधे जातीच्या दाखल्याकरिता आयोजित शिबिराला भरघोस प्रतिसाद 

धाटाव-शशिकांत मोरे

   रोहा तालुक्यातील धाटाव, बारसोली कातकरी वाडी येथे कातकरी समाजातील बांधवांचे जातीचे दाखले काढण्यासाठी शिबिरचे आयोजन करण्यात आले होते.या आयोजित शिबिराला १५५ जणांनी अर्ज भरून आपला प्रतिसाद दर्शविला.

     रोह्याचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने,तहसीलदार कविता जाधव,निवासी तहसीलदार राजेश थोरे आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी  शशिकला अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली २५ मार्च रोजी कातकरी समाजातील बांधवांचे जातीचे दाखले काढण्यासाठी धाटाव येथील बारसोली कातकरीवाडी येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराला लोणेरे कॉलेजचे प्राचार्य  मढवी, पेण येथील आदिवासी विकास निरक्षक मोरे,सानेगाव आश्रम शाळा शिक्षक नागोठकर, धाटावचे उपसरपंच अशोक मोरे,ग्रामविकास अधिकारी श्री दिपक चिपळूणकर,धाटावचे तलाठी भास्कर तुंबरे यांसह अंगणवाडी सेविका व वाडीवरील सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

     याकामी गावातील प्रतिश्ठीत युवा नेते रोहिदास पशिलकर यांनी मोलाचे सहकार्य केले.सकाळ पासूनच या शिबिराला सुरुवात झाल्याचे पहावयास मिळाले.दरम्यान शिबिरात १५५ जणांनी अर्ज दाखल करून सक्रिय सहभाग घेतल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळाला.

Comments

Popular posts from this blog