सोनारसिध्द करंडक क्रिकेट स्पर्धेत दर्या किनारा अष्टमी संघ अंतिम विजेता
धाटाव-शशिकांत मोरे
रोहा तालुक्यात नावाजलेल्या धाटाव येथील सोनारसिद्ध करंडक भव्य क्रिकेट स्पर्धेमधे सायंकाळी उशिरा पर्यत झालेल्या सामन्यात अखेर अष्टमी येथील दर्या किनारा या संघाने दमदार बाजी मारली आणि संपूर्ण सामन्यात अंतिम विजेता हा संघ ठरला.अंतिम फेरीत वाय.जी.एस. वरवठणे संघाला पराजीत करून दर्या किनारा संघ आकर्षक चषकाचा मानकरी ठरत सर्वात अव्वल ठरला.हजारो क्रीड़ा रसिकांच्या साक्षीने असंख्य मान्यवरांच्या उपस्थित या संघाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
सतत तीन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत एकूण १६ संघानी सहभाग दर्शविला होता.या स्पर्धेत वाय.जी.एस वरवठणे संघ उपविजेता ठरला तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक लांढर व चतुर्थ क्रमांक युनिकेम संघाला घोषित करण्यात आले.या संपूर्ण स्पर्धेत सूरज पवार याला मालिकावीर म्हणून एलईडी देऊन गौरविण्यात आले.उत्कृष्ट गोलंदाज युनीकेम संघाचा संकेत शिंदे याला सायकल तर उत्कृष्ट फलंदाज वाय. जी.एस. वरवठणे संघाच्या वृतिक पाटील याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यूनिकेम संघाच्या निलेश म्हस्करला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस विजय मोरे,तालुकाध्यक्ष जयवंत मुंढे,यशवंत रटाटे,यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
सतत तीन दिवस सुरु असलेल्या सामन्यांचे यूट्यूबच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आल्याने या स्पर्धा जगभरात पाहता आल्याने अनेकांनी आयोजकांशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधुन आभार व्यक्त केले.सामन्यांचे उत्तम समालोचन हर्षल मुंडे,उमेश साळुंखे,रूपेश रटाटे यांनी केले.
संयोजक देविदास धोंडगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सचिन पोटफोडे ,सुधिर मोरे,स्वप्निल शिंदे,उदय शेळके,बबल्या रटाटे, विशाल कदम ,श्रीकांत मोरे,सिधांत मोरे,नीलेश म्हसकर , विशाल माने ,रूपेश रटाटे,वीनेश रटाटे, मंदार बामुगडे , नरेश म्हसकर,केतन धोंडगे,भूषण मोरे,सौरभ फाटक , शुभम मोरे,नितेश मोरे , महेश पोटफोडे , रोहन म्हसकर , यशवंत फाटक , महेश मोरे, रुतीक रटाटे, योगेश पोटफोडे,नथुराम रटाटे यासह सहकारी वर्गाने विशेष मेहनत घेतली.
Comments
Post a Comment