छत्रपती शिवाजी महाराज पंचक्रोशी

 कबड्डी स्पर्धेचा भैरवीनाथ क्रीडा मंडळ

 मालसई संघ ठरला अंतिम विजेता

द्वितीय क्रमांक वांदोली, तृतीय क्रमांक यशवंतखार, चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला सोनगांव संघ

रोहा-प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालसई ता.रोहा येथे दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.


या सामन्यांचे उद्धघाटन रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष प्रितमताई पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.



छत्रपती शिवाजी महाराज पंचक्रोशी आयोजित कबड्डी स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला होता.


अटीतटीच्या व लक्षवेधी झालेल्या लढतींमध्ये प्रथम क्रमांक भैरवीनाथ मालसई संघाने पटकावला.द्वितीय क्रमांकाचा मानकरी वांदोली संघ ठरला. तृतीय क्रमांकाचा मानकरी यशवंतखार संघ व चौथ्या क्रमांकाचा मानकरी सोनगाव संघ ठरला.


सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान भैरवीनाथ मालसई संघाचा ऑलराऊंडर ओमकार तेलंगे याला मिळाला. उत्कृष्ट चढाई अजिंक्य कडव-वांदोली,उत्कृष्ट पक्कड रोशन चव्हाण- सोनगांव 

तर पब्लिक हिरो म्हणून कुमार धनावडे -मालसई या खेळाडूंना गौरविण्यात आले.
सामने पाहण्यासाठी परिसरातील कबड्डी रसिकांनी अलोट गर्दी केली होती.

 सामने यशस्वी करण्यासाठी भैरवीनाथ क्रीडा मंडळ मालसई यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog