कोलाड येथे कुणबी समाज आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद


रोहा-शरद जाधव

कोलाड येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुणबी समाजाच्या वतीने महिला दिन मोठ्या उत्साहात पार पडला. अनेक वर्षानंतर राबविलेल्या या कार्यक्र्मास महिला वर्गानी भरभरुन प्रतिसाद दिला.



सदर कार्यक्रम हा जनेरीक मेडिसन च्या रायगड जिल्हा प्रमुख सौ. नीलम राजेश कदम व कुणबी युवक अध्यक्ष संदेश लोखंडे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला होता.

या महिला दिनाचे निमित्ताने महिलांच्या पाककला स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून कुणबी समाज महिला नेत्या शमिकाताई महाबळे, डॉ.कांचन कदम,  डॉ नमिता दिघे, वकील सौ. शितल सानप,मुख्याध्यापिका वैशाली महाडीक, संपदा कुलकर्णी, अश्विनी बनसोडे, सोनल पाटील आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या. महिला दिनाचे महत्व विषद करताना,डॉ.कांचन कदम यांनी चेहरा व केस यांची काळजी कशी घ्यावी? योग्य आहार कसा असावा? यांचे आरोग्य विषयक मार्गदर्शन केले तर डॉ. नमिता दिघे यांनी महिलांना कँसर होऊ नये यासाठी  काय उपाय योजना आखावी? याचे मार्गदर्शन केले. वकिल सौ. शितल सानप यांनी वाचनाचे महत्व विषद केले तर मुख्याध्यापिका वैशाली महाडिक यांनी सध्याचे पालकत्व कसे असावे? याबद्दल महिलांना मार्गदर्शन केले तर सोनल पाटील यांनी सुंदर कविता सादर करुन महिलांची मने जिंकली.त्याचप्रमाणे सुवर्णा तटकरे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत महिलां बरोबर मार्गदर्शनात्मक संवाद साधला.



      कोलाड सारख्या ग्रामीण भागात कुणबी समाजाच्या महिलांना खुप नवनविन महिती  या महिला दिनानिमीत्त मिळाली 

पाककला स्पर्धेत जवळपास 100 महिलांनी सहभाग घेतला होता. तिसे,वरसगाव, आंबेवाडी,पुगाव,पाले,कोलाड सह अनेक गावातील महिलांनी सहभाग घेतला होता.  सदर स्पर्धेत गोड पदार्थांमधे पुगाव येथील महिला आदिती अशोक झोलगे यांना प्रथंम क्रमांक मिळाला. द्वितिय क्रमांक आंबेवाडी येथील ऋशाली राकेश लोखंडे हिने पटकावीला.

तिखट पदार्थाचे  प्रथम क्रमांक प्रनिती प्रमोद चोरगे, द्वितिय क्रमांक मिना रामकृष्ण कदम  यांना मिळाले. विजेत्यांना कुणबी समाजाच्या महिलांच्या उन्नती साठी झटत असलेल्या मेडिकल तसेच सहकार क्षेत्रात प्रगती पथावर असणाऱ्या  सौ. निलिमा राजेश कदम व मान्यवराच्या हस्ते विजेत्या स्पर्धकाना बक्षिस देण्यात आले.

  सदर कार्यक्रमास जान्हवी महाडिक,सुवर्णा तटकरे ,रोहिणी सुतार,प्रियंका पवार,रेशमा कोदे,निकीता म्हात्रे गिता लोखंडे,स्वाती ठाकुर,विद्या कदम,संध्या लोखंडे,अस्मिता कडव, पडवळ ताई,मोनिका हातकमकर,भाग्यश्री घोसाळकर यांनी सहकार्य केले.

      भविष्यात महिलां करिता असे विविध कार्यक्रम घेतले जातील असे निलिमा कदम यांनी सांगीतले.             

Comments

Popular posts from this blog