शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून पोलादपुर तालुक्यात होतेय उद्योगपतींकडुन प्लाॅट निर्मिती

पोलादपुर -आमिर तारलेकर

पोलादपुर तालुक्यामध्ये मोठ मोठ्या उद्योगपतींकडुन शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून छुप्या मार्गाने लाल मातीचे भराव व डोंगराचे उत्खनन करुन प्लाॅट तयार करीत असल्याचे दिसुन आले आहे.

पोलादपुर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये तसेच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागुन मोठ मोठ्या उद्योगपतींनी स्थानिक दलालांना हाताशी धरुन गोरगरीब शेतकऱ्यांनाच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या असून त्या जमिनींवर स्थानिक दलालांना हाताशी धरुन भरावाची कामे करुन प्लाॅट तयार करीत असल्याचे पाहावयास मिळत आहेत.


पोलादपुर तालुक्याच्या हद्दित मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असुन या चौपदरीकरणाच्या कामामुळे रस्त्याची उंची जमिनीपासुन ५ ते १० फुटापर्यंत वाढली असल्यामुळे या उद्योगपतींकडुन महामार्गाच्या बरोबरीने आपल्या जमिनींवर लाल मातीचे भराव करुन उंची वाढवत असल्याचे सर्रास प्रकार सुरु असल्याचे दिसुन आले आहे, तसेच तालुक्यातील डोंगरमाथ्यावर डोंगराचे उत्खनन करुन प्लाॅट करण्याचे कामे सुद्धा राजरोसपणे सुरु असल्याचे दिसत आहेत. अश्या उद्योगपतींना विविध राजकीय पक्षाचे नेते पाठिशी घालत असल्याचे देखिल बोलले जात आहे,

या उद्योगपतींकडुन गेल्या दोन तीन वर्षापासून तालुक्यातील डोंगरमाथ्यावर प्लाॅट तयार करण्याची कामे सुरु असल्यामुळे  जुलै २०२१ रोजी पडलेल्या अति-मुसळधार पाऊसामुळे २२ जुलै २०२१ रोजी आलेल्या महापुरामध्ये डोंगर भागांवर उद्योगपतींकडुन प्लाॅट करण्यासाठी उत्खनन केले गेले असल्यामुळे तेथील माती वाहून सावित्री नदी किनाऱ्यावरील गावांमध्ये पाण्याबरोबर वाहुन येवून गावातील रस्त्यावर व घराघरांमध्ये मातीचे ढिग पाहावयास मिळाले होते, त्यात प्रामुख्याने पुरग्रस्त सवाद गावात मातीचे ढिग साचण्यास सवाद गावा शेजारील कणगुले गावावरील डोंगरावर एका उद्योगपतीने गेल्या वर्षी स्थानिक दलाला ला हाताशी धरुन डोंगराचे उत्खनन केले गेले असल्यामुळे देखिल कारणीभुत ठरले होते, तालुक्यात ठिक ठिकाणी या उद्योगपतींकडुन राजरोसपणे प्लाॅट निर्मिती केली जात असल्याने अशा उद्योगपतींना शासन पाठिशी घालत आहे का ?असा प्रश्न येथील जनतेकडुन विचारला जात आहे.

Comments

Popular posts from this blog