कोलाड येथील युवकाचा दुचाकीवरुन पडून मृत्यू

 होळी सणात दुर्देवी घटना 


रोहा-शरद जाधव

               सण उत्सव हे कुटुंबाला आनंद देऊन जातात पण याच सण उत्सवात एखाद्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला तर क्षणात, होत्याचे नव्हते होईल ही कल्पनाच मनाला न पटणारी आहे. कोलाड (महादेववाडी) येथील 42 वर्षीय तरुणाचा दुचाकी वरुन प्रवास करित असताना गतिरोधकवरुन पडून मृत्यू झाला. होळीच्या सणात अतिशय दुर्देवी घटना घडली असुन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

                     कोलाड गावठण (महादेववाडी) येथील राजेश परशुराम चितळकर वय 42 हा तरुण तळोजा येथे नोकरीस होता. त्या परिसरात रात्री च्या वेळी हळदी कार्यक्रमावरुन येत  असताना दुचाकी गतीरोधकाला धडककल्याने युवकाचा मृत्यू झाला.सदर घटनेची खबर गावी समजताच ऐन सणात कुटुंबावर व गावावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. 

           राजेश चितळकर हा तरुण विवाहित होता. पत्नी, एक मुलगा, मुलगी ,आई असा परिवार आहे, मित्र मंडळी मध्ये वावरणारा होता. गावच्या सामाजिक कार्यात तो हिरेरिने सहभाग घेत होता. मनमिळाऊ स्वभाव होता. सदरची घटना अतिशय दुखद असुन ऐन तारुण्यात घरातील कर्तबगार कमवत्या व्यक्तीचे निधन झाल्याने कोलाड परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog