मालसई येथे क्रिकेट सामन्यांचे उद्धघाटन उत्साहात संपन्न
रोहा-प्रतिनिधी
ग्रामीण भागातील क्रिकेटला चालना मिळावी या उद्देशाने भैरवीनाथ क्रिडा मंडळ मालसई ता.रोहे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यांचे उद्धघाटन करून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.
रोहे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा प्रितम पाटील, कुणबी युवक मंडळ तालुकाध्यक्ष अनंत थिटे,माजी अध्यक्ष महेश बामुगडे, युवा कार्यकर्ते निशिकांत पाटील,महेश तुपकर, हेमंत मालुसरे,ग्रा. पं.सदस्य अनिल आयरे,निलेश मालुसरे,सदाशिव मालुसरे,नरेश मालुसरे, येणाजी शिंदे,माजी सरपंच नथुराम मालुसरे,उपसरपंच सुनिल मोहिते,प्रकाश मराठे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
श्री शिवछत्रपती असोसिएशन पंचक्रोशी यांच्या मान्यतेने व भैरवीनाथक्रिडा मालसई क्रीडा मंडळ मालसई यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यात उद्धघाटनीय सामना भैरवीनाथ मालसई विरूद्ध जय भवानी मुठवली या दोन संघामध्ये झाला.तर स्पर्धेत विभागातील एकूण १६ संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून स्पर्धेतील रंगत वाढविली.
Comments
Post a Comment