सिद्धिविनायक साडी सेंटर चे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते उध्दघाटन संपन्न

कोलाड- शरद जाधव

रोहा तालुक्यातील अद्ययावत व सर्व सोईयुक्त असलेल्या रोहा शहरात ग्राहकांसाठी सिद्धिविनायक साडी सेंटर या दुकानाचे उध्दघाटन कोकण चे विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते महाशिवरात्री चे औचित्य साधून करण्यात आले.

         यावेळी समवेत जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, दुकानाचे मालक दत्ताराम कदम, नगरसेवक मयुर दिवेकर महेंद्र गुजर, दिवेश जैन,ज्ञानेश्वर साळुंखे,हरिभाऊ वारंगे, तळाघर सरपंच मनोज कळंबे, मयुर खैरे, राकेश शिंदे,सनी पितळे, मयुर मोंडे, देवीदास शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी या साडी सेंटर शॉपीचे मालक दत्ताराम कदम यांनी सांगितले की,"आमचे मुंबई येथे साडीचे अद्ययावत  दुकान आहे. गेली अनेक वर्षाचा कापड व्यवसायाचा अनुभव असल्याने आम्ही गुणवत्ता टिकवून आहोत,विस्तारलेले  व पुढारलेले रोहा शहर ,शहराचे वाढलेले नागरीकरण ,अद्यावत  बाजारपेठ ,यामुळे येथील ग्राहकांना साडीच्या वेगवेगळ्या  व्हरायटी आम्ही देणार आहोत. आंम्हाला विश्वास आहे की, आमचे सिद्धिविनायक साडीसेंटर ग्राहकांच्या पसंतीला उरेल व आंम्ही ही ग्राहकांचे हित जपू असे कदम यानी सांगितले". 

         तर गेली 2 वर्ष कोरोना सारख्या संकटातून  बाहेर पडून आपण  सगळे सावरत आहोत. व्यापारी वर्ग आत्ता व्यवसाय करण्याकरिता सज्ज झाला असताना, सुरु असलेला लग्नसराईचा काळ पहाता सिद्धिविनायक साडी सेंटर निश्चितच महिला वर्गाच्या पसंतीला उरेल असा विश्वास आमदार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त करीत कदम यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. 

          तर सुरेश मगर यांच्या विनंतीला मान देऊन आमदार अनिकेत तटकरे उपस्थित राहिल्याबद्दल आमदारांचे व सुरेश मगर यांचे  सिद्धिविनायक साडी सेंटर तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog